Published On : Sun, Nov 18th, 2018

प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत

नागपूर: प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांचे भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने रायपूर येथून दुपारी 2.15 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या आगमनाप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे महापौर श्रीमती नंदाताई जिचकार, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, आमदार सुधाकर कोहळे, विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विमानतळावरील स्वागताचा स्विकार केल्यानंतर प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांचे दुपारी 2.30 वाजता हवाईदलाच्या विशेष हेलिकॉप्टरने मध्यप्रदेशातील छिंदवाड्यासाठी प्रयाण झाले.