नागपूर : शहरातील मोपेड चोरीच्या वाढत्या घटनांवर अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. क्राइम ब्रांचने कुख्यात चोर ऋषभ असोपा याला दिघोरी येथील ओयो हॉटेलमधून अटक केली. त्यावेळी तो आपल्या गर्लफ्रेंडसोबत मजेमस्ती करत होता.
जामिनावर सुटताच ऋषभने पुन्हा चोरीचे सत्र सुरू केले होते. भावासोबत आणि नाबालिग साथीदारासह त्याने अल्पावधीतच अनेक मोपेड गायब केल्या. चौकशीत त्याने गुन्हे कबूल केले असून पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेल्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
लकडगंज परिसरात झालेल्या अॅक्टिवा चोरीच्या प्रकरणातून या टोळीचा माग काढला गेला. सीसीटीव्हीत असोपा बंधूंना पाहिल्यानंतर पोलिसांनी माहिती गोळा केली आणि त्यानुसार ओयो हॉटेलवर धाड टाकत ऋषभला ताब्यात घेतले.
चोरीची कमाई उधळण्यात आणि ऐशोआरामात खर्च करणाऱ्या या टोळीमुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले होते. पुढील तपासासाठी ऋषभ असोपा याला लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याचा भाऊ आणि नाबालिग साथीदार फरार आहेत.










