Published On : Fri, Aug 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर मनपाच्या सभेत ‘वंदे मातरम्’चे अर्धवट गायन; महापौरांनी मागवला चौकशी अहवाल

Advertisement

Video: Nagpur Civic Body Faces Questions Over Singing Only Two Stanzas of ‘Vande Mataram’

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत वंदे मातरम् गीताचे अर्धवट गायन झाल्याने महापौर निता ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत महापौरांनी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांना पत्र पाठवून चौकशी आणि आवश्यक कारवाईचे निर्देश दिले आहेत.

२० ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन भवन येथे मनपाची सर्वसाधारण सभा पार पडली. सभेच्या सुरुवातीला वंदे मातरम् गायनाची परंपरा आहे. मात्र, यावेळी गीत पूर्ण होण्यापूर्वीच गायन थांबवण्यात आल्याचे निदर्शनास आले.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अधिकृत आणि महत्त्वाच्या सभेत वंदे मातरम् गीताचे अर्धवट गायन होणे योग्य नसल्याचे महापौरांनी पत्रात स्पष्ट केले. या प्रकारामागील नेमके कारण काय, याची चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच भविष्यात अशा प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यासह मनपाच्या सभांमध्ये राष्ट्रगीत आणि वंदे मातरम् गायनासाठी निश्चित कार्यपद्धती तयार करण्याचे आदेशही महापौरांनी दिले आहेत. महापौरांच्या या भूमिकेमुळे मनपा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.