Published On : Thu, May 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात हत्यासत्र सुरूच; दगडाने ठेचून युवकाची हत्या; एमआयडीसी परिसरात खळबळ!

Advertisement

नागपूर : शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आणखी एका धक्कादायक घटनेची भर पडली आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आधार नगरी, इसासनी परिसरात एका अज्ञात युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीती आणि खळबळ पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षाच्या 112 हेल्पलाईनवरून एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. माहिती मिळताच बीट मार्शल आणि पोलिस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पंचनामा केला तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकल रुग्णालयात पाठवला.

Gold Rate
Aug 14 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,32,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्राथमिक तपासात अज्ञात आरोपींनी युवकाच्या डोक्यावर दगडाने वार करून हत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली आहेत.

दरम्यान, मृत युवकाची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून त्याची माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून संशयित हालचालींचा मागोवा घेतला जात आहे. स्थानिक नागरिकांकडूनही माहिती संकलित केली जात आहे.
या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलिसांसह क्राईम ब्रँचची टीम करत असून, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन यांनी घटनेला दुजोरा देत आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला.
या घटनेमुळे आधार नगरी आणि इसासनी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Advertisement
गोदाम का दरवाजा तोड़कर डेढ़ लाख का वायर साफ #nagpurnews #nagpur #crimenews

गोदाम का दरवाजा तोड़कर डेढ़ लाख का वायर साफ #nagpurnews #nagpur #crimenews

गर्भपात और कामोत्तेजक दवाइयों की बिना लाइसेंस बिक्री का आरोप #nagpurnews #news

गर्भपात और कामोत्तेजक दवाइयों की बिना लाइसेंस बिक्री का आरोप #nagpurnews #news

25 हजार रुपए की रिश्वत लेते भूमापक रंगेहाथ गिरफ्तार #vidarbhanews #nagpur #newsupdate  #nagpurnews

25 हजार रुपए की रिश्वत लेते भूमापक रंगेहाथ गिरफ्तार #vidarbhanews #nagpur #newsupdate...

त्योहारों को लेकर अकोला प्रशासन अलर्ट, तैयारी तेज #vidarbhanews #akola #newsupdate #vidarbha #news

त्योहारों को लेकर अकोला प्रशासन अलर्ट, तैयारी तेज #vidarbhanews #akola #newsupdate #vidarbha...

बावनकुले ने छात्रों संग थामा तिरंगा, निकाली रैली #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha

बावनकुले ने छात्रों संग थामा तिरंगा, निकाली रैली #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha

किसानों के जमीन अधिकारों पर सरकार का बड़ा फैसला #maharashtranews #pune #newsupdate #maharashtra

किसानों के जमीन अधिकारों पर सरकार का बड़ा फैसला #maharashtranews #pune #newsupdate...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges