Advertisement
नागपूर : कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
कोराडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे . वृत्त प्रकाशित होईपर्यंत मृत महिलेची ओळख पटलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Advertisement