Published On : Fri, Apr 27th, 2018

नागपूर: नंदनवन आणि रामटेकेनगरात खून


नागपूर: नंदनवन आणि अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या खुनाच्या घटना घडल्या. नंदनवनमधील खुनाची घटना अनैतिक संबंधातून घडली असून, अजनीतील खुनाबाबत वृत्त लिहिस्तोवर अधिकृत माहिती उपलब्ध झाली नव्हती.

नंदनवनमधील पडोळेनगरात आकाश देशभ्रतार राहतो. त्याचा नातेवाईक रवी पावस्कर (वय २२) हा भरतावाडा, पारडी येथे राहत होता. त्याचे आकाशच्या घरी जाणे-येणे होते. त्यामुळे आकाशच्या मनात भलताच संशय निर्माण झाला होता. रवीचे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय निर्माण झाल्याने आकाशने त्याचा मित्र आकाश मंडल (वय २८, रा. जयभीम चौक) याच्याशी संगनमत करून पावस्करच्या खुनाचा कट रचला. त्यानुसार, गुरुवारी रात्री १०.४५ वाजता त्याला घरी बोलविले आणि तलवार तसेच चाकूचे घाव घालून पावस्करचा खून केला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. या प्रकरणात आरोपी आकाश देशभ्रतार आणि आकाश मंडल याच्याविरुद्ध देशभ्रतारची पत्नी खूशबू हिने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यावरून मध्यरात्री नंदनवन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

खुनाची दुसरी घटना शुक्रवारी सकाळी अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामटेकेनगरात उघडकीस आली. मृतकाचा दोन आरोपीने दगडाने ठेचून निर्घृन खून केला. मृताची ओळख पटली नाही मात्र दोन संशयितांची नावे उघड झाली असून, दुपारी १२.३० पर्यंत ते पोलिसांच्या हाती लागले नव्हते. दारूच्या वादातून ही हत्या झाली असावी, असा संशय अजनी पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement