Published On : Fri, Aug 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात जेलमधून जामिनावर सुटलेल्या खूनप्रकरणातील आरोपीची दगडाने ठेचून हत्या; तिघे ताब्यात!

सिंबायोसिस कॉलेजमागील जंगलात रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह
Advertisement

नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. खूनाच्या गुन्ह्यात जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेल्या २० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. सिंबायोसिस कॉलेजच्या मागील जंगल परिसरात त्याचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताची ओळख पारडी येथील प्रतीक राजू करांडेकर (वय २०) अशी झाली आहे. २०२५ मध्ये एचबी टाउन परिसरातील खूनप्रकरणात प्रतीक आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक करण्यात आली होती. सुमारे दोन महिन्यांपूर्वी तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता.

Gold Rate
Sept 09,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,35,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गुरुवारी सायंकाळी प्रतीक घरातून दुचाकी घेऊन बाहेर पडला होता. मात्र शुक्रवारी सकाळी सिंबायोसिस कॉलेजच्या मागील जंगलातील झुडपांमध्ये त्याचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळला. घटनास्थळावरील प्राथमिक तपासात रात्री प्रतीक काही जणांसोबत त्या परिसरात असल्याचे आणि सर्वांनी एकत्र मद्यप्राशन केल्याचे समोर आले आहे.

दारू पिताना झालेल्या वादातून प्रतीकच्या डोक्यावर दगडाने वार करून त्याची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी तिघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू असून खुनामागील नेमके कारण, जुने वैर किंवा अन्य कोणता कट होता का, याचा तपास वाठोडा पोलीस करत आहेत.

Advertisement

शवविच्छेदन अहवाल आणि चौकशीतून समोर येणाऱ्या माहितीच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.