Published On : Fri, Aug 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

कळमणा पोलिसांची ड्रग्ज तस्करांविरोधात कारवाई; 2.043 किलो गांजासह कार जप्त, दोघे अटकेत

Advertisement

नागपूर : अमली पदार्थांविरोधातील मोहिमेला गती देत कळमणा पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 किलो 43 ग्रॅम गांजा, एक मोबाईल फोन आणि फोर्ड फिगो कार असा एकूण 4 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतिक रफीक खान (वय 33) आणि अमित विनायक मानकर (वय 37) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 ऑगस्ट रोजी नियमित गस्तीदरम्यान हरिस्तीनगर ते भिलगाव सिटी मार्गावर संशयास्पदरीत्या उभी असलेली फोर्ड फिगो कार पोलिसांच्या नजरेस पडली. वाहनाची झडती घेतली असता कारमधून 2 किलो 43 ग्रॅम गांजा, वनप्लस कंपनीचा मोबाईल आणि फोर्ड फिगो कार असा एकूण 4.60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी कळमणा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 707/2026 अंतर्गत एनडीपीएस कायद्यातील कलम 8(क), 20(ब)(ii)(ब) आणि 29 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

ही कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त नित्यानंद झा आणि सहाय्यक पोलिस आयुक्त रोहित ओव्होळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमणा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण काळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) करीम पठाण, पोलिस उपनिरीक्षक गजानन राऊत तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

अमली पदार्थांबाबत कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांना कळवून सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.