नागपूर– नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर मतदान व मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती आज (१२ जानेवारी २०२६) आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. शहरातील ३८ प्रभागांमध्ये होणाऱ्या या निवडणुकीसाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केले असून सुरक्षित, पारदर्शक आणि सुरळीत मतदान प्रक्रिया पार पाडण्यावर भर देण्यात आला आहे.
शहरात एकूण ३८ प्रभाग असून त्यामध्ये ३७ चार-सदस्यीय व १ तीन-सदस्यीय प्रभाग आहे. या निवडणुकीतून एकूण १५१ नगरसेवक निवडले जाणार आहेत.
मतदान व मतमोजणीचा कार्यक्रम-
महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होणार आहे.
मतमोजणी शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होईल.
२४.८३ लाख मतदार मतदानासाठी सज्ज-
या निवडणुकीसाठी नागपूर शहरात एकूण २४,८३,११२ मतदार नोंदणीकृत आहेत.
त्यामध्ये १२,२६,६९० पुरुष, १२,५६,१६६ महिला आणि २५६ इतर मतदारांचा समावेश आहे.
मतदान केंद्रांची भक्कम व्यवस्था-
शहरात एकूण ३,००४ मतदान केंद्रे असून ती १,६४४ मतदान इमारतींमध्ये स्थापन करण्यात आली आहेत.
यापैकी ३२१ अतिसंवेदनशील व २९३ संवेदनशील मतदान केंद्रे असून तेथे विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतदान पथक व सुरक्षा- मतदान प्रक्रियेसाठी ३,५७९ केंद्राध्यक्ष,१०,७३७ मतदान अधिकारी
नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलिस किंवा होमगार्ड कर्मचारी तैनात असेल. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रिया आणि EVM हाताळणीचे दोन टप्प्यांत प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय २४४ झोनल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
मतदारांसाठी मूलभूत सुविधा (AMF)-
प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी रॅम्प, फर्निचर, पिण्याचे पाणी, व्हीलचेअर, प्रथमोपचार किट आदी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
वाहतूक आराखडा-
मतदान पथक व साहित्य वाहतुकीसाठी नागपूर महानगरपालिकेकडून विशेष व्यवस्था करण्यात आली असून यासाठी सुमारे ५०४ मनपा बसेस वापरण्यात येणार आहेत.
EVM व्यवस्था पूर्ण-
झोननिहाय मतदानासाठी EVM कमिशनिंग पूर्ण झाले असून उपलब्ध यंत्रांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.कंट्रोल युनिट (CU) : ४,००९
बॅलेट युनिट (BU) : १०,९२८
मतदार सुविधा व तंत्रज्ञान-
मतदारांना नाव शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे Voter App (Play Store वर उपलब्ध) वापरता येणार आहे. तसेच मतदार पावती (Voter Slip) घरोघरी वितरित करण्यात येत असून, नाव शोधण्यासाठी मतदार सहाय्यता केंद्रेही स्थापन करण्यात येणार आहेत.
SVEEP अंतर्गत जनजागृती-
मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी SVEEP उपक्रमांअंतर्गत सायकल रॅली, बाईक रॅली, सेल्फी पॉईंट, बलून फेस्टिव्हल, रांगोळी स्पर्धा आदी विविध जनजागृती मोहिमा राबविण्यात येत आहेत.
आदर्श आचारसंहिता व पथके
आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून
FST – ६०,
SST – ५७,
VST – ४०,
VVT – १० पथके कार्यरत आहेत.
याशिवाय राजकीय पक्षांसोबत १८ डिसेंबर २०२५ व ५ जानेवारी २०२६ रोजी बैठकाही घेण्यात आल्या.
वेबकास्टिंग व मतमोजणी आराखडा
शहरातील २५५ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.
मतमोजणीसाठी १० मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आली असून प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर २० EVM टेबल व ४ पोस्टल बॅलेट टेबल असतील. प्रत्येक टेबलवर पर्यवेक्षक व सहाय्यक नियुक्त करण्यात आला आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर मीडिया कक्ष असणार असून सर्व प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी सुरू होणार आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून शांततापूर्ण व पारदर्शक मतदानासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचा विश्वास निवडणूक प्रशासनाने व्यक्त केला आहे.








