Published On : Wed, Jun 26th, 2019

बंद शाळांमध्ये फूड मॉल आणि भाजी मार्केट; नागपूर महापालिकेचं बजेट

Advertisement

नागपूर: नागपूर महापालिकेचा २०१९-२०२० या आर्थिक वर्षासाठीचा ३१९७. ६० कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आली नसली तरी पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी पालिकेच्या बंद पडलेल्या शाळांमध्ये विधानसभानिहाय भाजी मार्केट आणि फूड मॉल उघडण्याचा संकल्प अर्थसंकल्पातून व्यक्त करण्यात आला आहे.

पालिकेच्या शाळेत भाजी मार्केट उभारण्याच्या पालिकेच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले जात असून या निर्णयावर टीका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Gold Rate
24 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 98,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपा स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी आज महापालिका सभागृहात २०१९-२०२० या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प २९७ कोटीने वाढला आहे.

आज मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात नागपूरकरांवर कोणताही बोझा लादण्यात आलेला नाही. उलट अनेक नव्या आणि जुन्या योजना मार्गी लावण्याचा संकल्प या अर्थसंकल्पातून व्यक्त करण्यात आला आहे.

अर्थसंकल्पावर एक नजर

आता झोननिहाय अतिक्रमण पथकाची रात्री ८ वाजेपर्यंत अनधिकृत बांधकामांवर कारवाई चालणार

हनुमान नगर झोनचे नामांतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं करण्यात येणार

पालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्यात येणार, मात्र या कर्मचाऱ्यांना सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगातील लाखो रुपयांच्या एरिअर्सवर पाणी सोडावं लागणार आहे.

नदीनाले व धोकादायक बांधकामांच्या दुरुस्ती तसेच स्वच्छतेसाठी १० कोटींची तरतूद

शहरातील चार स्मशानभूमीत पांढरा कोळसा आणि शेणाच्या गोवऱ्यांचा पुरवठा करणार

ऊर्जा बचतीसाठी घरोघरी एलईडी दिवे लावण्याचा प्रस्ताव

एक व्यक्ती, एक झाड ही संकल्पना राबवून तीन वर्षांत नागपूर शहर हिरवेगार करणार

Advertisement
Advertisement