Published On : Sat, Jun 27th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर महापालिकेचा 6,202 कोटींचा अर्थसंकल्प; पर्यटन, डिजिटलायझेशन, स्टार्टअपसह पर्यावरणपूरक विकासावर भर!

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या 2026-27 च्या अर्थसंकल्पात शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा करण्यात आली. स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात पर्यटन, डिजिटल सेवा, पर्यावरण संवर्धन, स्टार्टअप, डेटा सेंटर, मुलांसाठी विशेष उपक्रम आणि नागरिकाभिमुख सुविधा यांवर विशेष भर देण्यात आला आहे.

शहरातील हॉटेलांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रथमच हॉटेल वर्गीकरण व प्रमाणपत्र प्रणाली लागू करण्यात येणार आहे. या माध्यमातून पर्यटकांना दर्जेदार सेवा मिळण्यास मदत होणार असून नागपूरची पर्यटननगरी म्हणून ओळख अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पर्यटनाला चालना देण्यासाठी #VisitNagpur या उपक्रमाअंतर्गत शहरातील पर्यटनस्थळे, खाद्यसंस्कृती, सांस्कृतिक वारसा आणि वर्षभरातील विविध उत्सवांची माहिती देणारी अधिकृत माहिती पुस्तिका तसेच वार्षिक फेस्टिव्हल कॅलेंडर तयार करण्यात येणार आहे.

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने तलावांमधील जलपर्णीपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक बॅगमध्ये नगरसेवकांना अर्थसंकल्पाच्या प्रती वितरित करण्यात आल्या. तसेच शहराला झिरो कार्बन फुटप्रिंटच्या दिशेने नेण्यासाठी सुसबिडी प्रकल्पाद्वारे स्वच्छ ऊर्जा आणि ऊर्जा बचतीला प्रोत्साहन दिले जाणार आहे.

Advertisement

डिजिटल नागपूरच्या दिशेने मोठे पाऊल टाकत महापालिका कर, पाणीपुरवठा आणि इतर सेवांसाठी एआय-आधारित चॅटबॉट प्रणाली विकसित करणार आहे. नागरिकांना तत्काळ सेवा मिळाव्यात यासाठी अत्याधुनिक डेटा सेंटर उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘जमशेदजी टाटा इनक्युबेशन सेंटर’ उभारण्यात येणार असून स्टार्टअप संस्कृतीला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर नगरसेवकांसाठी स्वतंत्र डिजिटल तक्रार निवारण प्रणाली विकसित करून तक्रारींचा ऑनलाइन पाठपुरावा करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

शहरात अत्याधुनिक मत्स्यालय उभारण्यासाठी महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहकार्याने महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तसेच सुरेश भट सभागृहात विद्यार्थ्यांसाठी आणि लहान मुलांसाठी राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विशेष बाल चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

शहरातील निवडक चौकांमध्ये दररोज सकाळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारे संगीत प्रसारित करण्याचा ‘महा संगीत’ उपक्रमही राबविण्यात येणार आहे. पश्चिम नागपूरातील बाजीप्रभू नगर येथील महापालिका उद्यानाला ‘नरवीर बाजीप्रभू देशपांडे उद्यान’ असे नाव देण्याची घोषणाही करण्यात आली.

अर्थसंकल्प सादर करताना सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाचा विशेष उल्लेख केला. हा अर्थसंकल्प राजमाता जिजाऊंपासून ते ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या वीर जवानांच्या मातांना समर्पित असल्याचे त्यांनी नमूद केले.

महापौर निता ठाकरे यांनी या अर्थसंकल्पाला सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा आणि नागपूरच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया दिली.

“वादळांना सांगून ठेवा, आमची दिशा बदलणार नाही… नागपूरच्या विकासाचा दीप कोणत्याही वाऱ्याने विझणार नाही.” भाषणाचा समारोप करताना शिवानी दाणी-वखरे यांनी कविवर्य सुरेश भट यांच्या ओळींनी विकासाचा निर्धार व्यक्त केला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.