नागपूर : नागपूर महापालिकेने 440 कोटींचे कर्ज घेण्याची तयारी केली आहे. पोहरा नदी प्रकल्पासाठी पालिका प्रशासन हे कर्ज घेणार आहे. पोहरा नदी प्रकल्प हा शहराच्या दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील गटारांचे जाळे सुधारण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.
केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने 900 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात महापालिकेचा वाटा 50 टक्के आहे. नाग नदीसोबतच पोहरा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी नागपूर महापालिकेने आराखडा तयार केला.
या दोन्ही योजनांमध्ये नागपूर महानगरपालिकेचा प्रकल्प खर्चात 50 टक्के वाटा आहे. पोहरा नदी प्रकल्पात नदीचे शुद्धीकरण तसेच गटारांचे जाळे सुधारण्याची तरतूद करण्यात आली. सुमारे 900 कोटी रुपयांच्या या योजनेचे सुरुवातीचे काम महापालिकेने स्वत:च्या निधीतून सुरू केले होते, मात्र आता निधीची कमतरता लक्षात घेऊन त्यासाठी 440 कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची तयारी महापालिकेने केली आहे. महापालिकेने नियमानुसार कर्ज घेण्याची प्रक्रियाही पूर्ण केली आहे.