Published On : Fri, Mar 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर मनपाचा ५५४१ कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर; विकासकामांवर भर!

-मनपा आयुक्त इटनकर यांची माहिती
Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचा सन 2026-2027 या आर्थिक वर्षासाठीचा प्रस्तावित अर्थसंकल्प आज मनपा आयुक्त विपिन इटनकर यांनी पत्रकार परिषदेत सादर केला. शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा आणि घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या नागरी सुविधांना प्राधान्य देत हा अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

दोन भागांत तयार अर्थसंकल्प-
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 95 नुसार सन 2025-2026 चा सुधारित आणि सन 2026-2027 चा प्रस्तावित अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. मनपाच्या उत्पन्न-खर्चाचा सविस्तर तपशील ‘भाग-अ’ मध्ये देण्यात आला असून पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभागाचा अर्थसंकल्प ‘भाग-क’ मध्ये मांडण्यात आला आहे.

Gold Rate
Mar 13 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,60,100/-
Gold 22 KT ₹ 1,48,900 /-
Silver/Kg ₹ 2,66,400/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उत्पन्न आणि खर्चाचा आढावा-
मनपा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सन 2025-2026 या वर्षासाठी निव्वळ उत्पन्न 4702.75 कोटी रुपये राहण्याचा अंदाज असून सुरुवातीची शिल्लक 698.87 कोटी रुपये आहे. त्यामुळे सुधारित उत्पन्न 5401.62 कोटी रुपये इतके होणार आहे.

तर सन 2026-2027 या वर्षासाठी मनपाचे अंदाजित उत्पन्न 5541.31 कोटी रुपये इतके राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
खर्चाची तरतूद

सन 2025-2026 मध्ये मनपाचा एकूण खर्च 5085.63 कोटी रुपये राहणार असून त्यात ‘भाग-अ’ मध्ये 3789.23 कोटी आणि ‘भाग-क’ मध्ये 1296.40 कोटी खर्च अपेक्षित आहे.

तर सन 2026-2027 या वर्षासाठी एकूण खर्च 5840.65 कोटी रुपये इतका प्रस्तावित करण्यात आला आहे. यात ‘भाग-अ’ साठी 4358.56 कोटी, तर ‘भाग-क’ साठी 1482.09 कोटी खर्चाची तरतूद आहे.

परिवहन उपक्रमासाठी निधी
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मनपाकडून परिवहन उपक्रमासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सन 2025-2026 मध्ये 170 कोटी रुपये, तर सन 2026-2027 मध्ये 160 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

स्वनिधी व शासन अनुदान
प्रस्तावित अर्थसंकल्पात मनपाच्या स्वनिधीचा हिस्सा 3889.48 कोटी रुपये असून शासनाकडून मिळणारे अनुदान 1651.83 कोटी रुपये इतके आहे. तसेच आगामी वर्षात महसुली खर्च 2512.26 कोटी रुपये, तर भांडवली खर्च 3155.91 कोटी रुपये इतका राहणार आहे.

नागरिकांच्या सुविधांवर लक्ष-
रस्ते, पथदिवे, शिक्षण, आरोग्य सेवा, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा व मलनिस्सारण यांसारख्या सुविधा शहराच्या सर्व भागांत उपलब्ध व्हाव्यात यासाठी या अर्थसंकल्पात विशेष लक्ष देण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. नागपूर शहर राज्य व देशातील विकासाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे यावे, यासाठी विविध विकासकामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement