नागपूर : आनंद, चैतन्य आणि उमेदीने सुरू झालेले २०२४ हे वर्ष आता मावळतीला आले आहे. या सरत्या वर्षाने अनेक कडू गोड आठवणी आणि चिरकाळ स्मरणात रहाव्यात अशा पाऊलखुणा उमटविल्या आहेत. नागपूर शहराची पालकसंस्था म्हणून नागपूर महानगरपालिकेने २०२४ या वर्षात अनेक महत्वाचे निर्णय घेतले.अनेक प्रकल्पांना मूर्तरूप दिले, शाळांतील शिक्षणाचा दर्जा वाढविण्याची योजना आखली, नवनव्या संकल्पनांतून नागरिकांसाठी दिलासादायक कार्य केले तर संकटाच्या क्षणी खंबीरपणे साथही दिली. सरत्या वर्षात नागपूर महानगर पालिकेने सुरुवातीपासून केलेल्या विकास कार्यासह कल्याणकारी उपक्रमांच्या मालिकेसह स्वतःची पाठ थोपटली आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाग नदी सफाई अभियानाचा शुभारंभ-
नागपूर शहरातून वाहणाऱ्या नद्यांची सफाई अभियानाचा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवारी १ जानेवारी २०२४ रोजी शुभारंभ झाला. महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी २०२४ यावर्षी १ जानेवारीपासून नदी स्वच्छता अभियान सुरू करण्याचे निर्देश दिले होते, त्यानुसार अंबाझरी घाटपासून नाग नदी सफाई अभियानाला सुरूवात झाली.
मनपाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गिफ्ट ऑफ हेल्थ’-
नागपूर महानगरपालिका आणि रोटरी क्लब नागपूर ईशान्य यांचा संयुक्त उपक्रमाद्वारे ‘गिफ्ट ऑफ हेल्थ’ हे आरोग्यविषयक अभियान राबविण्यात आले.
अमरावतीचा आकाश राजपूत ठरला महानगरपालिका श्री 2024-
नागपूर महानगरपालिका आणि बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन विदर्भ नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने लकडगंज येथील अनाथ विद्यार्थी गृह क्रीडांगणावर नागपूर महानगरपालिका श्री २०२४ शरीर सौष्ठव स्पर्धेतअमरावतीचा आकाश राजपूत महानगरपालिका श्री २०२४चा मानकरी ठरला.
पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पासाठी 810 कोटीची निविदा-
नागपूर शहरातील प्रमुख नदी असणाऱ्या पोहरा नदीचा चेहरा-मोहरा पुढील दोन वर्षात बदलण्याच्या नागपूर महानगरपालिकेने पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पासाठी केंद्र शासन व राज्य शासनाच्या सहकार्याने 810 कोटीचा निविदा प्रक्रीयाला सुरुवात केली.
मिनी सक्शन कम रिसायकल मशिनच्या सहाय्याने स्वच्छता कार्य-
नागपूर शहरातील गजबजलेल्या व दाट वसाहतीतील सिवर चेंबरची स्वच्छता करण्यासाठी अनुकूल अशा “मिनी सक्शन कम रिसायकल” मशीनने स्वच्छता कार्याला सुरुवात करण्यात आली.
नागपूर स्मार्ट सिटीला हेल्दी स्ट्रीट्स कार्याबद्दल केंद्र शासनाचा पुरस्कार –
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MOHUA), स्मार्ट सिटी मिशन आणि पिंपरी-चिचवड स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर (NSSCDCL) ला ‘भारतातील शहरांमध्ये हेल्दी स्ट्रीट्स’ तयार करण्यात अग्रेसर असल्याबद्दल उत्कृष्टतेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कचरा संकलन आणि शौचालयांच्या स्वच्छतेसाठी आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली-
नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाव्दारे घराघरातून होणारे कचरा संकलन आणि शौचालयांच्या स्वच्छतेमध्ये आधुनिक तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करायला सुरुवात केली आहे.
रामदासपेठ पूल वाहतुकीसाठी सुरू-
नागपूर शहरात नव्याने निर्माण करण्यात आलेले रामदासपेठ पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी सुरू करण्यात आले.
मनपाच्या पहिल्या ‘पुष्पोत्सव’ प्रदर्शनाचे उद्घाटन –
नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाद्वारे पूर्व नागपुरातील लता मंगेशकर उद्यानात प्रथमच ४ दिवसीय ‘पुष्पोत्सव’ प्रदर्शनाचे ११फेब्रुवारी रोजी आमदार श्री. कृष्णा खोपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले.
वॉकर स्ट्रीटवर स्मार्ट पब्लिक टॉयलेटचे भूमिपूजन व लोकार्पण-
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने व जिल्हा नियोजन समिती नागपूर यांच्या सहकार्याने सिव्हिल लाइन्स येथील वॉकर स्ट्रीट येथे स्मार्ट पब्लिक टॉयलेट उभारण्यात आले.
‘शिक्षणोत्सव २०२३-२४’: ब्रिज अलर्ट सिस्टीमला प्रथम पुरस्कार-
नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे आयोजित ‘शिक्षणोत्सव २०२३-२४’ अंतर्गत मनपा, यंग कलाम डिस्कव्हरी सायन्स सेंटर नागपूर यांच्या वतीने व एचसीएल फाऊंडेशन आणि एसईडीटीच्या सहकार्याने आयोजित विज्ञान आणि चित्रकला, हस्तकला ब्रिज अलर्ट सिस्टीम या मॉडेलला प्रथम पुरस्कार मिळाला.
अतिवृष्टीबाधित भागांसाठी जाहीर २०४ कोटींच्या कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरूवात-
नागपूर शहरात २२ सप्टेंबर २०२३ च्या मध्यरात्री आलेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक भागांचेमोठे नुकसान झाले.त्यानुसार अतिवृष्टीबाधित भागांसाठी जाहीर २०४ कोटींच्या कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली.
मनपा प्रशासकांनी मांडला 5523 कोटी खर्चाचा अर्थसंकल्प –
नागपूर महानगरपालिकेचे प्रशासक आणि आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी 2024-24 या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प २९ फेब्रुवारी रोजी सादर केला. मनपा आयुक्तांनी 2024-25 या वर्षाचा 5565 कोटी उत्पन्नाचा आणि 5523.73 कोटी खर्चाचा व 41.34 कोटी शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर केला.
महालातील अनधिकृत बांधकामावर हातोडा-
मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाल परिसरात करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर नागपूर महानगरपालिकेद्वारे हातोडा चालविण्यात आला.
मनपाच्या उद्यानात “क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीम” सुरु- मनपा क्षेत्रातील उद्यानांमध्ये “क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रीड्रेसल सिस्टीम” ही प्रणाली विकसित करण्यात आली.
बालकांच्या संपूर्ण लसीकरणासाठी मनपाचे फिरते लसीकरण केंद्र-
लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणेपर्यंत येउ न शकणा-या समुदायातील बालके लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात फिरते लसीकरण केंद्राद्वारे लसीकरणाला गती देण्यात आले.
बारावीच्या निकालात मनपाच्या विद्यार्थिनींची भरारी-
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या मनपाच्या विद्यार्थिनींनी उत्तुंगभरारी घेतली.
-मनपातर्फे झोननिहाय ‘आपदामित्र’ संकल्पना
-नाल्यांच्या पुलांवर सुरक्षा जाळी
– नवजीवन देण्यात आलेल्या वटवृक्षाचा वाढदिवस साजरा
-अंबाझरीतील जलपर्णी काढण्यासाठी सरसावले शेकडो हात
-महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाच्या वतीने सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम
-मिशन नवचेतना– मनपा शाळांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करणारा उपक्रम
-नदी स्वच्छता अभियान : १ लाख ३१ हजार क्यूबिक मीटर गाळ काढला
-मनपाच्या शाळांमध्ये किलबिलाट; “प्रवेशोत्सवा”मुळे भारावले विद्यार्थी
– मुख्यमंत्री–माझी लाडकी बहीण योजनासाठी मनपाद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची सोय
-आयुक्तांच्या हस्ते आपली बसच्या ऑनलाईन तिकीटींग योजनेचे लोकार्पण
– पोलीस आयुक्तांनी साधला मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद
-मनपा ला ‘सिस्टमॅटिक प्रोग्रेसिव्ह ॲनालिटिकल रिअल टाइम रँकिंग’ पुरस्कार
-लोकसहभागातून ‘स्टॉप डायरिया’ अभियान
-‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’चे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
– बांधकाम आणि पाडाव कचऱ्यावर पुनर्वापर प्रक्रिया सुरू
-व्ही.एन.आय.टी. च्या रस्ता नागरिकासाठी खुला
-मनपाच्या संयुक्त चमूने वाचविले १०० नागरिकांचे प्राण
-मनपातील ४०४ पदांवर प्रशिक्षणार्थींची निवड
– मनपा शाळांमध्ये दप्तराविना शनिवार
-५० गुणवंत सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार
-हुडकेश्वर व नरसाळा भाग टँकर मुक्त घोषित
-स्मार्ट सिटीच्या 27 प्रकल्प बधितांना मिळाला “होम स्वीट होम” चा ताबा
-‘हर घर तिरंगा’ अभियान : मनपात अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली “तिरंगा प्रतिज्ञा”
-आयुक्तांच्या हस्ते ‘नागपूर सिटी ईव्ही रेडिनेस प्लॅन’चे अनावरण
-स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा मनपाद्वारे सन्मान
-सुरक्षा जाळीवरील “इको ब्रिक्स” कलाकृतीचे आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन
– स्वच्छ नागपूर साकारण्यासाठी मनपाची ‘आत्मनिर्भर वार्ड’ संकल्पना
-आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते १२ निर्माल्य रथाचे लोकार्पण
– ना. नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला समस्यांचा आढावा
-कर्णबधिर दिव्यांगांना शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य योजना
-‘उडान खेल प्रोत्साहन योजना’ सुरू
-आयुष्मान आरोग्य मंदिराचे १ लक्ष पेक्षा जास्त नागरिकांनी घेतले लाभ
-मनपात साकारली “स्वच्छता ही सेवा”ची बोलकी सुबक भव्य रांगोळी
-२१३ झोपडपट्टी धारकांच्या घरी भाडेपट्टे सूपुर्द
-“एक पेड माँ के नाम” उपक्रमांतर्गत सहा ठिकणी वृक्षारोपण
-नाग नदी : मनपा व टाटा कन्सलटन्सी इंजिनीअर्स लि. मध्ये करारनामा
-मनपा शाळांच्या ‘बोलक्या भिंती’ करिता सरसावल्या संघटना
-दीक्षाभूमीवर मनपाचे अहोरात्र सेवाकार्य
-झिंगाबाई टाकळी यूपीएचसीला कायाकल्प राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार
-नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज कॅम्पसचे भूमिपूजन
-मोमिनपुरा ई-लायब्ररीचे भूमिपूजन व गांधीसागर तलाव सौंदर्यीकरण
-इंदिरा गांधी रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागाचे लोकार्पण
-अमृत-2 योजनांतर्गत मलनि:सारण व गटरलाईन प्रकल्पाचे भूमिपूजन
-IASOWA तर्फ़े मनपा आस्था भिक्षेकरी पुनर्वसन केंद्रात कपडे वाटप
– रेबीज मुक्त नागपूर अंतर्गत २० हजार ३९२ श्वानांचे लसीकरण
-नागपुरकरांनी साजरी केली ‘स्वच्छ दिवाळी-शुभ दिवाळी’
-मियावाकी पद्धतीने वृक्षारोपणाचा आयुक्तांच्या हस्ते शुभारंभ
-मनपाच्या १५ आरोग्य केंद्रांमध्ये पॉलिक्लिनीक सेवा सुरू
-संविधान दिनानिमित्त मनपात संविधान प्रस्ताविकाचे सामुहिक वाचन
-मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत शहरातील चार लाखावर अर्ज मंजूर
-नवीन हेरिटेज संवर्धन समितीची पहिली बैठक
-विद्यार्थी म्हणाले ‘थँक यू एनएमसी…’
-आयुक्तांच्या हस्ते मनपा शाळेतील पोषण आहार उपक्रमाला सुरूवात
-नागपूर स्मार्ट सिटीचे ट्रॅफिक पोलीस बूथ पोलिसांसाठी वरदान
-स्वच्छ सर्वेक्षणासाठी मनपा सज्ज
-अतिरिक्त आयुक्तांच्या हस्ते शंभर दिवसीय क्षयरोग दुरीकरण मोहिमेचा शुभारंभ
-मनपाच्या दिव्यांग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
-के.टी. नगर आरोग्य केंद्रात सुरु होणार ‘मेट्रोपोलीटन सर्वेलन्स यूनिट’
-हेरिटेज टास्क फोर्स समितीद्वारे कस्तुरचंद पार्क व झिरो माईलचे निरीक्षण
-कंटेनर-आधारित ड्राय फर्मेंटेशन मोबाईल युनिटचे उद्घाटन
-कडाक्याच्या थंडीत बेघरांना मनपाचा ‘निवारा’
-मनपा व स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची नगर विकास विभागाचे प्रधान सचिवांनी केली पाहणी
-मनपातील ४५ अधिकाऱ्यांना पदोन्नती
-बारामतीतही राबविणार ‘स्मार्ट पब्लिक टॉयलेट’ संकल्पना