Published On : Wed, May 18th, 2022

नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन 2022 अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या अनुषंगाने मा.राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी दि. 12 मे 2022 रोजी अंतिम प्रभाग रचनेस मंजुरी प्रदान केली आहे व सदर मंजुरीनंतरची अंतिम प्रभाग रचनेची माहिती मा.राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार आज दि. 17 मे, 2022 रोजी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवर (www.nmcnagpur.gov.in) तसेच झोन कार्यालयात प्रसिध्द करण्यात आली आहे.

सदर अंतिम प्रभाग रचना ही सन 2011 च्या जनगनणेच्या आकडेवारीवर आधारित असून, त्या अनुषंगाने एकूण लोकसंख्या, अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती यांची लोकसंख्या त्या आधारे निश्चित करण्यात आली आहे. सदर मंजुर प्रभाग रचनेनुसार नागपूर महानगरपालिकेत एकूण 156 सदस्य असणार असून, एकूण प्रभागाची संख्या 52 इतकी असणार आहे. प्रभागाची सरासरी लोकसंख्या 47067 इतकी असून सर्वाधिक लोकसंख्या ही प्रभाग क्र. 29 ची 54093 इतकी असून सर्वात कमी लोकसंख्या प्रभाग क्र. 48 ची 41092 इतकी असणार आहे.

Advertisement

नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांनी सांगितले कि राज्य निवडणूक आयोगाने नागपूर मनपाच्या अंतिम प्रभाग रचनेला मंजुरी प्रदान केली आहे. निवडणूक आयोगाने प्रभाग क्रमांक २९, ४६ आणि ४८ मध्ये काही बदल केले आहेत. प्रभाग २९ मध्ये लोकसंख्येत २३०० ने वाढ झालेली आहे तसेच प्रभाग ४६ मध्ये लोकसंख्या ९४ ने कमी झाली आहे. प्रभाग ४८ मधील लोकसंख्या १२६८ ने कमी झालेली आहे. बाकी प्रभाग रचने मध्ये काही बदल नाही.

याव्दारे सर्व संबंधीतांना आवाहन करण्यात येते की नागरिकांच्या माहितीस्तव सदर अंतिम प्रभाग रचना तपशील मनपा केंद्रीय निवडणूक कक्ष, सर्व झोन कार्यालये तसेच मनपाचे वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आला असून याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement