Published On : Mon, Oct 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप; धमकी देत गप्प ठेवण्याचा प्रयत्न

कॅफेमध्ये अत्याचार केल्याचा आरोप; नंदनवन पोलिसांकडून पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
Advertisement

नागपुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप; धमकी देत गप्प ठेवण्याचा प्रयत्न

नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेले प्रकरण समोर आले आहे. आरोपीने पीडितेला धमकावून घटनेची माहिती कुणाला देऊ नये, असा दबाव टाकल्याचे तक्रारीत नमूद आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर नंदनवन पोलिसांनी २० वर्षीय समीर शेख याच्याविरुद्ध अत्याचाराच्या संबंधित कलमांसह पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेची आरोपी समीर शेख याच्याशी तिच्या मैत्रिणीमार्फत ओळख झाली होती. आरोपीने आवडत असल्याचे सांगत तिच्याशी मैत्री वाढवली. त्यानंतर २९ जुलै २०२६ रोजी नंदन परिसरातील एफ झोन कॅफेमध्ये तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

धमकीमुळे पीडितेने सुरुवातीला ही घटना कुणालाही सांगितली नाही. मात्र, आरोपीकडून वारंवार त्रास दिला जात असल्याने तिने अखेर वडिलांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी सामाजिक सुरक्षा व कल्याण संस्थेशी संपर्क साधला.

पोलिसांच्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी आरोपी पीडितेच्या घरी पोहोचला आणि प्रेग्नन्सी किटद्वारे तपासणी करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पीडिता कुटुंबीय आणि सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींसह नंदनवन पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तक्रार दाखल केली.

Advertisement

या प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तो सध्या फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. घटना ज्या एफ झोन कॅफेमध्ये घडल्याचा आरोप आहे, त्या कॅफेची भूमिका आणि संबंधित बाबींचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.