Published On : Sat, Mar 31st, 2018

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

NIT Nagpur
नागपूर: नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ७१७ गावांचा समावेश असलेल्या महानगर क्षेत्राच्या विकासाला आकार देण्यात येत असून, गृहबांधणी प्रकल्प,रस्त्यांचे जाळे, लॉजिस्टिक हब सारख्या एकाहून एक योजनांचा विकास आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनानी दि.०७/१०/२०१७ रोजी महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना(प्रशामित संरचना)२०१७ पासून अंमलात आले आहेत. त्या अंतर्गत दि. ३१/१२/२०१५ पूर्वीची अनधिकृत विकास बांधकाम आणि भूखंडके/अभिन्यास नियमिती करण(प्रशमन संरचना) करून घेण्याकरिता संधी उपलब्ध करून दिलेली आहे. कलम ५२(क) अंतर्गत/प्रशमन करून घेण्याकरिता ना.म.प्र.वि.प्रा. द्वारे दि.०६/०४/२०१८ पर्यंत अर्ज मागविण्याकरिता दि. १०/११/२०१७ ला स्थानिक वर्तमान पत्राद्वारे नागरीक तसेच विकासकांकडून अर्ज मागविण्यात आले होते, ज्यांचे दिनांक ३१.१२.२०१५ पूर्वीचे बिनामंजुरी विकास/भूखंडके/अभिन्यास/बांधकामे केली आहेत त्यांच्या करता आता ही मुदत वाढ दिनांक ३१.१०.२०१८ पर्यंत वाढविण्यात येत आहे. यांची सर्व नागरीक आणि विकासकांनी नोंद घ्यावी तसेच यासंधीचा लाभ घ्यावा असे आव्हान नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण द्वारे नागरिकांना करण्यात येत आहे.

ना.म.प्र.वि.प्रा. द्वारे क्षेत्रातील नागरिकांना आव्हान
उक्त क्षेत्रातील भूखंड/सदनिका यांना जिल्हाधिकारी, नागपूर/नागपूर सुधार प्रन्यास,नागपूर ची मंजुरी प्राप्त असल्याची शाहनिशा करूनच भूखंड/सदनिकांच्या खरेदी विक्री करावेत. तसेच बांधकामांना आरंभ प्रमाणपत्र (Commencement Certificate) प्राप्त असून बांधकाम परवानगीनुसार होत असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच गाळे,सदनिका खरेदी करतांना विकासकांकडून भोगवटा प्रमाणपत्राची (Occupation Certificate) मागणी करावी असे आव्हान नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण द्वारे करण्यात येत आहे.