Published On : Mon, Nov 13th, 2017

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

Advertisement


नागपूर:
नागपूर सुधार प्रन्यास द्वारे कार्यानवयीत अभिकरण म्हणून राबविण्यात येणारे विकास प्रकल्प आता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून राबविल्या जावेत असा निर्णय देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. सदर बैठकी मध्ये महानगर आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी नासुप्र द्वारे राबविल्या जात असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले व सुरु असलेल्या प्रकल्पांच्या कामाबद्दल मा.मुख्यमंत्री यांना अवगत केले. साध्यास्थितीत नासुप्रद्वारे विकास प्रकल्पांची कामे सुरु आहेत व प्रस्तावित कामे पुढे प्राधिकरणा मार्फत सुरू ठेवण्याबाबत महानगर आयुक्त यांनी सांगितले.

नागपूर सुधार प्रन्यास द्वारे सध्यास्थितीत १) श्री. महालक्ष्मी जगदंबा संस्थान,कोराडी त.कामठी,जि.नागपूर या तीर्थस्थळाचा विकास प्रकल्प २) विभागीय क्रिडा संकुल नागपूर ची उर्वरित कामे ३) शांतिवन,चिचोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैयक्तिक वापराच्या वस्तुंचे जतन व संरक्षण करणे, संग्राहालयाचे आधुनिकीकरण करणे व परिसराचे सुशोभिकरण करणे ४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटरचे बांधकाम ५) प्रधानमंत्री आवास योजना (सर्वांना घरे २०२२) या अंतर्गत परवडणारी घरे (एकूण १०००० गरीब लोकांकरीता घुरकुलांचे बांधकाम करणे) ६) मौजा.चिखली (देव) आणि मौजा.पारडी येथे आदिवासी मुलांचे वसतीगृह निर्माण कार्य ७) मौजा.वाठोडा येथे नासुप्रद्वारे बांधण्यात येणाऱ्या सर्व सामान्य लोकांना परवडणाऱ्या घरकुल योजना ८) लकडगंज पोलीस स्टेशन परिसरात पोलीस स्टेशन व कर्मचाऱ्यांकरिता ३४८ निवासी गाळ्यांचा प्रकल्प ९) मोठा ताजबाग येथील हजरत बाबा ताजुद्दीन दर्गा परिसराचे विकास कार्य १०) मौजा.चिखली(देवस्थान) येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहर(पूर्व)चे बांधकाम ११) नागपूर शहरात 10 सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट चे काम केल्या जात आहे


त्याच प्रकारे प्रस्तावित प्रकल्पांची कामे पुढील प्रमाणे आहेत : अ) फुटाळा तलाव येथे संगीत कारंजे, लाईट व लेझर मल्टीमिडीया शो तसेच अंबाझरी उद्यान येथे स्वामी विवेकानंद यांचे जीवनावर आधारित लाईट, साउंड व मल्टीमिडिया शो ब) दीक्षाभूमी स्तुपाचे नूतनीकरण व मजबुतीकरण क) बुद्धिस्ट सर्किट अंतर्गत दीक्षाभूमी-नागपूर, शांतीवन-चिचोली व ड्रैगन पैलेस- कामठी येथील विकास कामे ड) ड्रैगन पैलेस – कामठी येथे पर्यटन स्थळ परिसरात मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच इ) नागपूर ग्रामीण क्षेत्रात वाकी, आदासा, धापेवाडा, पारडसिंगा, नारायणपूर, नागपूर शहरातील ताजबाग, तेलंगखेडी, वर्धा जिल्ह्यात केळझर, गिरड या सर्व ठिकाणी पर्यटन विकासाची कामे ई) संत चोखामेळा येथे 1000 विध्यार्थीसाठी वसतिगृहाचे बांधकाम करणे ही कामे भविष्यात तो नागपूर महानगर प्राधिकरण कडून पूर्ण करण्यात येतील.