Published On : Tue, Jul 16th, 2019

जर्मनीच्या राजदूतांनी केले नागपूर मेट्रो रेल प्रकल्पांचे कौतुक

Advertisement

उच्चस्तरीय जर्मन शिष्टमडळाचा नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचा दौरा

नागपूर: नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी जर्मनीचे उच्च स्तरीय शिष्टमडळ आज एक दिवसाच्या दौऱ्यावर आले होते. या शिष्टमडळाचे नेतृत्व जर्मनीचे भारतातील राजदूत श्री. वॉल्टर लिंडनर यांनी केले. आपल्या या एक दिवसीय दौऱ्यांच्या दरम्यान नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या विविध पैलूचा आढावा घेत त्यांनी नागपूर मेट्रो प्रकल्पाचे तोंड भरून कौतुक केले. या शिष्टमंडळात के.एफ.डब्लू. डेव्हलपमेंट बँक,जर्मनी यांचे प्रतिनिधी सहभागी होते.

भारत आणि जर्मनी या दोन्ही देशांतर्गत झालेल्या कराराअंतर्गत आढावा बैठकीच्या निमित्याने हा दौरा आयोजित करण्यात आला होता. या प्रतिनिधीमंडळात जर्मनीचे भारतातील राजदूत श्री. वॉल्टर लिंडनर,जर्मन एंम्बेसीच्या राजनीतिक विभागाच्या सल्लागार श्रीमती.मिरीयम स्ट्रॉबेल्स व के.एफ.डब्लू.(जर्मनी) शहरी विकास व मोबिलिटी विभागाच्या विशेष प्रतिनिधी श्रीमती. स्वाती खन्ना यांचा समावेश होता. तसेच महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.बृजेश दीक्षित यांच्या नेतृत्वात महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पासंबंधीची सविस्तर माहिती शिष्टमंडळाला दिली.

जर्मनीच्या शिष्टमंडळाने मल्टी मॉडेल इंटिग्रेशन, सोलर एनर्जीच्या वापरा संबंधी माहिती जाणून घेतली. यासह ५डी-बीम,बहुपदरी वाहतूक व्यवस्था,एएफसी प्रणाली सारख्या बांबीची विस्तृत माहिती जर्मन पदाधिकाऱ्याना दिली. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पासंबंधीचे सादरीकरण या शिष्टमंडळाना करण्यात आले. या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने खापरी मेट्रो स्टेशन ते सिताबर्डी इंटरचेंज पर्यंत मेट्रोने प्रवास केला. मेट्रोच्या खापरी स्टेशनकरून मेट्रो रेल प्रकल्पाची पाहणी केली मेट्रोच्या फिडर सर्वीसचा भाग असलेल्या पेडल सायकलची फेरी याप्रसंगी राजदूत श्री. लिंडनर व महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.दीक्षित यांनी केली. तसेच सदर उपक्रम मेट्रो कॉरीडोर मध्ये राबवावा असे विचार त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी पेडल सायकलच्या बैटरी प्रणालीची माहिती जाणून घेतली.

त्यांनी खापरी,न्यू एयरपोर्ट आणि सिताबर्डी स्टेशन वरील विविध कलाकृती तसेच उपक्रमांची माहिती जाणून घेतली. प्रकल्पाअंतर्गत चारही दिशेने सुरु असलेल्या मेट्रो कार्याचा आढावा घेतल्या नंतर जर्मनीच्या शिष्टमंडळाने मेट्रोच्या संपूर्ण कार्याची प्रशंसा केली.
मुख्यतः ५ डी व ६ डी- बीम वर सुरु असलेले मेट्रोचे कार्य वेळेआधी पूर्ण होत असून याचा आपल्याला आनंद होत असल्याचे मत यावेळी शिष्टमंडळाने व्यक्त केले.

या प्रसंगी जर्मनीचे भारतातील राजदूत श्री. वॉल्टर लिंडनर : नागपूर मेट्रो रेल प्रकल्पामध्ये ग्रीन मेट्रोची संकल्पना यशस्वीपणे राबविली जात असून नागपूर मेट्रोने चांगल्या उपक्रमाची सुरुवात केली आहे असे श्री. वॉल्टर म्हणाले. तसेच गर्दी पासून वाचविण्यात नागपूरकरांनी जास्तीत जास्ती मेट्रोचा उपयोग करावा व सर्व स्टेक होल्डर्स ने देखील याचा लाभ घ्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले. पहिल्यांदाच मेट्रो रेल प्रकल्पामध्ये सोलर पॅनलचा उपयोग होत असल्याचे बघून आपल्याला आनंद होत असून मेट्रोने ही संकल्पना मोठ्या प्रमाणात राबवावि ही ईच्छा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी महा महा मेट्रोचे संचालक(प्रकल्प) श्री.महेश कुमार,संचालक(वित्त)श्री. एस.शिवमाथन, महाव्यवस्थापक(प्रशासन) श्री.अनिल कोकाटे, महाव्यवस्थापक(ऑपरेशन व मेंटेनन्स) श्री.सुधाकर उराडे व इतर अधिकारी उपस्थित होते.