Published On : Fri, Mar 8th, 2019

प्रदर्शनीत मेट्रो प्रकल्पाच्या कार्याची प्रशंसा, सोमवारपर्यंत राहणार सुरु

Advertisement

नागपूर: नागपूर मेट्रो प्रकल्पात आजपर्यंत झालेल्या अद्भुत कार्याची माहिती नागरिकांना मिळावी याउद्देशाने तयार करण्यात आलेली प्रदर्शनी सोमवारपर्यंत सुरु राहणार आहे. नागरिकांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत प्रदर्शनीची वेळ ठेवण्यात आली आहे. यादरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिक प्रदर्शनाला भेट देत आहेत. प्रदर्शनीत येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना प्रकल्पाच्या कार्याविषयी सविस्तर माहिती देण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यानंतर अवघ्या ४ वर्षाच्या अल्पकालावधीत मेट्रोची प्रवासी सेवा सुरु करण्यासाठी कश्या प्रकारे महा मेट्रोने कार्य केले, याचा संपूर्ण तपशीत प्रदर्शनीत सादर करण्यात आला आहे. मुख्यम्हणजे मेट्रो प्रकल्पाअंतर्गत निर्माणाधीन आणि प्रस्तावित ३ व ४ स्तरीय वाहतूक व्यवस्थेच्या संकल्पनेची प्रशंसा नागरिक करीत आहेत. तर अत्याधुनिक बांधकाम, स्टेशनच्या भव्य इमारतीचे बांधकाम, मध्य नागपुरात उभारण्यात येणारे नवे प्रकल्प व त्याचा आराखडा नागरिकांसाठी खास आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement