Published On : Tue, Nov 28th, 2017

ऑटोमेटिक फेयर कलेक्शन सिस्टम

Advertisement


नागपूर: महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पामध्ये तयार होत असलेल्या मेट्रो स्टेशन मध्ये लावण्यात येणाऱ्या ऑटोमेटिक फेयर कलेक्शन सिस्टम गेटच्या प्रात्यक्षिक आज व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या उपस्थित करण्यात आले. डॉ. दीक्षित यांनी ऑनलाईन संचालित गेट आणि उपकरणचे निरीक्षण केले. उल्लेखनीय आहे कि, मेट्रो स्टेशनच्या प्लेटफार्म मध्ये प्रवेश करण्यापूर्वी लावण्यात येणारे हे गेट क़्युआर कोडच्या माध्यामाने उघडणार व बंद होणार. कम्प्युटर प्रणालीच्या माध्यमाने हे गेट जोडण्यात आलेले आहे. जसे स्टेशन मध्ये यांची व्यवस्था राहणार आहे तशीच हुबे-हूब व्यवस्था मेट्रो हाऊस मध्ये उभारण्यात आलेल्या खापरी स्टेशनच्या डेमो मध्ये यांचे प्रात्यक्षिक करन करण्यात आले. सर्वानसाठी उपयुक्त असलेले असे उपकरण या प्रणालीच्या माध्यमाने आपण सहज पने ये-जा-करू शकता. हे ऑटोमेटिक फेयर कलेक्शन सिस्टम प्रायोरिटी सेक्शन मधील तीन मेट्रो स्थानके खापरी स्टेशन,एयरपोर्ट साउथ आणि न्यू एयरपोर्ट स्टेशन मध्ये बसविल्या जाणार आहे.

क़्युआर कोड तिकीट हे तीन प्रकारचे राहणार आहे जसे कि, सिंगल जर्नी, रिटर्न जर्नी, आणि ग्रुप टिकेट्स जे स्टेशन च्या तिकीट काउंटरवर उपलब्ध राहणार आहे. यात्रीकरू ची विभिन्न श्रेणी या ठिकाणी करण्यात आली आहे. वयस्क, लहान मुल, दिव्यांग आणि वरिष्ठ नागरिकांना तिकीट शुल्क मध्ये सहुलियत दिली जाणार. नागपूर मेट्रोत्तर्फे मेट्रो मध्ये दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बक्षीसच्या स्वरूपात ऑफर दिली जाणार ज्याचा मुख्य उद्देश नागरिकांना मेट्रो मध्ये प्रवास करण्यासाठी प्रोत्साहित करने आहे. क़्युआर टीकीट आणि स्मार्ट कार्ड हे कॅश,क्रेडीट कार्ड आणि डेबिट कार्ड च्या माध्यमातून तिकीट ऑफिस टर्मिनल मधून विकत घेता येणार.


सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना या गेट सोबत जोडण्यात आले आहेत. क़्युआर कोड असलेले टीकीट,स्मार्ट कार्ड,मोबाईल टीकीट गेटच्या हातावर ठेवातच गेट आपोआप उघडणार आणि बाहेर निघताना गेट बंद होणार. या सिस्टम चे सरलीकृत डिझाइन प्रवाशांना सहजपणे प्रवास करण्यास मददगार ठरेल.