Published On : Mon, Aug 31st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात मेफेड्रोनसह ७.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त; एक आरोपी अटकेत तर दुसरा फरार

Advertisement

नागपूर : नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने आणि बुटीबोरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मेफेड्रोनसह तब्बल ७ लाख ६५ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाला.

नागपूर ग्रामीण पोलिसांचे अंमली पदार्थविरोधी पथक नागपूर उपविभागात गस्त घालत असताना मेफेड्रोनची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर बुटीबोरी पोलिसांच्या मदतीने बुटीबोरी एमआयडीसी चौक परिसरात सापळा रचण्यात आला.

यावेळी एमआयडीसी चौकातून पुण्यनगरी प्रेस रोडच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या फोर्ड इकोस्पोर्ट कारवर पोलिसांना संशय आला. पोलिसांची गाडी दिसताच चालकाने कार घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून कार अडवली.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कारची झडती घेतल्यानंतर बुटीबोरी येथील ३४ वर्षीय एजाज गुलाम शेख याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत असलेला अन्य एक व्यक्ती अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला.

पंचांसमक्ष आरोपी आणि कारची झडती घेतली असता ७.१३ ग्रॅम मेफेड्रोन पावडर, दोन मोबाईल फोन, एक कार आणि १० हजार रुपये रोख असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ७ लाख ६५ हजार ६५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement

या प्रकरणी बुटीबोरी पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एजाज शेखला अटक करण्यात आली असून, फरार साथीदाराचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.