Published On : Wed, Nov 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या गणेशपेठेत MD ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश; दोघांना अटक, ७.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त!

साखले गुरुजी शाळेमागे सुरू होता कथित नशेचा व्यवहार; अ‍ॅक्टिव्हा आणि कारचाही वापर
Advertisement

नागपुर में MD ड्रग्स तस्करों पर एंटी नारकोटिक्स टीम का शिकंजा

नागपूर : उपराजधानीत अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक्स पथकाने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून पोलिसांनी एमडी ड्रग्जसदृश पावडरसह दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत ७ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, आरोपींच्या चौकशीत ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या आणखी दोघांची नावे समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक्स पथकाला गणेशपेठ परिसरात अमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने साखले गुरुजी शाळेमागील रस्त्यावर छापा टाकला. यावेळी संशयावरून दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले. शेख फैजान शेख असलम आणि अब्दुल अनीस अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते मोठा ताजबाग परिसरातील रहिवासी आहेत.

पोलिसांनी केलेल्या झडतीत त्यांच्याकडून सुमारे ७ ग्रॅम एमडी ड्रग्जसदृश पावडर आढळून आली. तिची किंमत ७१ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय तीन मोबाईल फोन, एक अ‍ॅक्टिव्हा मोपेड आणि एक कार असा एकूण ७ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमली पदार्थांच्या व्यवहारासाठी वाहनांचा वापर केला जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

दरम्यान, अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या अमन इंगळे आणि संदीप कश्यप या दोघांची नावे पुढे आली आहेत. हे दोघेही इमामवाडा परिसरातील रामबाग, मैत्री बुद्ध विहार भागातील रहिवासी असल्याची माहिती आहे. मात्र, ते अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसून त्यांचा शोध सुरू आहे.

Advertisement

या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींना पुढील तपासासाठी गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शहरात एमडी ड्रग्जचा पुरवठा करणारे जाळे किती मोठे आहे आणि या तस्करीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.