Published On : Wed, Jun 6th, 2018

नागपुरी पर्यटनासाठी महापौरांची आंतरराष्ट्रीय स्तरावर साद

Advertisement

नागपूर: देश आणि महाराष्ट्राच्या पर्यटनाची महती सांगतानाच नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी नागपुरी पर्यटनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांना साद घातली. ‘टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ अशी ओळख असलेल्या नागपूरच्या संस्कृती, परंपरा आणि पर्यटनाची ओळख त्यांनी जगाला करून दिली.

चीनमधील झेंग शू शहरात पर्यटन या विषयावर आधारीत आंतरराष्ट्रीय महापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर नंदा जिचकार भारताच्या प्रतिनिधी म्हणून परिषदेत सहभागी झाल्या होत्या. २९ ते ३१ मे दरम्यान आयोजित ही परिषद ‘सिटी टुरिझम इनोव्हेशन इन द शेअरिंग इकॉनॉमी’ या संकल्पनेवर आधारीत होती. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या जगभरातील शहरांतील महापौर आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे सुमारे ५०० तज्ज्ञ यात सहभागी झाले होते.

नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांच्यासह चाटोरक्सचे (फ्रान्स) उपमहापौर हुगन जीन, आऊटबॅक पायोनिअरचे संस्थापक रिचर्ड जॉन किनन, चायना टॉप व्ह्यू टुरिझम इन्व्हेस्टमेंट डेव्हलपमेंट ग्रुप लि.चे उपमहाव्यवस्थापक झांग शुमीन, चायनिज अकादमी ऑफ सोशल सायन्सेसच्या सहयोगी शास्त्रज्ञ मा कॉगलिंग यांचा प्रामुख्याने सहभाग होता.

Advertisement

परिषदेत महापौर नंदा जिचकार यांनी ‘नागपूरच्या शाश्वत विकासात पर्यटन कशी महत्त्वाची भूमिका बजावू शकेल’, याबाबत सादरीकरण केले. . या परिषदेत ‘बेल्ट ॲण्ड रोड’ टुरिजम सिटीज समीट, परिसंवाद, आंतरराष्ट्रीय पर्यटन शहर प्रदर्शन राहील. शाश्वत शहरी विकासात पर्यटन महत्त्वाची भूमिका बजावू शकेल काय, याबाबत विचारमंथन करण्यात आले.


शहरी विविधता आणि पर्यटन स्थिरतेवर चर्चा

सदर परिषदेत जगभरातील तज्ज्ञांनी शहरी विविधता आणि पर्यटनाच्या बदलत्या मापदंडावर गटचर्चा करण्यात आली. जगभरातील सार्वजनिक धोरण निर्मात्यांसाठी शहरी विविधता आणि पर्यटन स्थिरता मुख्य प्राथमिकता बनल्या आहेत. आज, नेहमीपेक्षा अधिक शाश्वत पर्यटन विकासाचे व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे. पर्यावरणविषयक समस्यांमुळे आणि त्यांचे जागतिक परिमाण लक्षात न घेता ते प्राप्त करणे शक्य नाही. विविध समस्या आणि समाजाच्या आवश्यकता आणि शहरी क्षेत्रांच्या विकासासाठी शहरांना आकर्षक पर्यटन स्थळांमध्ये रुपांतरीत करणे शक्य आहे.

पर्यटन हा व्यवसाय परंपरागत वस्तुमान पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, निसर्ग पर्यटन, स्पा पर्यटन, व्यापार पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, ग्रामीण पर्यटन, शहरी पर्यटन आदींचा समावेश असलेला व्यवसाय आहे. यासाठी परिसरातील पर्यटन विकासावर नियंत्रण, पर्यटनातून रोजगार, जीवनाच्या गुणवत्तेत सुधार, टूर ऑपरेटरसाठी मार्गदर्शक तत्त्वे, विविध क्षेत्रांसाठी स्वीकार्यता मर्यादा सेट करण्यासाठी पर्यटन क्षेत्रातील मान्य आंतरराष्ट्रीय मानकांचा वापर, नैसर्गिक व सांस्कृतिक संसाधनाचे संरक्षण करण्याच्या क्षेत्रात व्यवस्थापन सुधारण्यासाठी शैक्षणिक आणि प्रशिक्षण कार्यक्रम अंमलात आणणे ह्या बाबी महत्त्वाच्या आहेत, असा सूर गटचर्चेतून निघाला.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement