नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, नागपूर महानगर तर्फे सेवा पंधरवाडा अंतर्गत भव्य महिला पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित केला गेला.
कार्यक्रम २१ सप्टेंबर रोजी जरीपटका येथील महात्मा गांधी शाळेत पार पडला. प्रदेश भाजप उपाध्यक्ष संजय भेंडे, माजी आमदार गिरीश व्यास, माजी आमदार मिलिंद माने, राज्य व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विक्की कुकरेजा, महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. दिव्याताई धुरडे आणि कार्यक्रमाच्या मुख्य संयोजक सौ. मोहिनी रामटेके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शेकडो महिला कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. महिला मोर्चाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक सौ. मोहिनी रामटेके यांनी सर्वांचे आभार मानले.