नागपूर: दारू पिऊन वाहनचालकांवर कारवाई करताना पोलिसांनी केलेल्या दंडाची वसुली आज (१३ सप्टेंबर) लोकअदालतमार्फत करण्यात आली. एकाच दिवशी तब्बल ५७ लाख ८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल झाला आहे. नागपूर शहरातील विविध झोनमधील प्रकरणे लोकअदालत मध्ये ठेवण्यात आली होती. एकूण ९६ प्रकरणांची निकाली काढणी झाली.
लोकअदालत कारवाईत ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ (दारू पिऊन वाहनचालक) तसेच ई-चलान थकबाकी भरून घेण्यात आली.
झोननिहाय वसुली :
- अजनी झोन : ₹५.८२ लाख
- कॉटन मार्केट : ₹६.४२ लाख
- इंदोरा : ₹४.३७ लाख
- कंपीटी : ₹५.९१ लाख
- लकडगंज : ₹५.८० लाख
- एमआयडीसी : ₹५.९९ लाख
- सदर : ₹५.४१ लाख
- सक्करदरा : ₹४.४८ लाख
- सीताबर्डी : ₹५.८६ लाख
- सोनेगाव : सर्वाधिक ₹६.९८ लाख
यामध्ये दारू पिऊन वाहनचालकांवर लावलेला दंड, ई-चलान तसेच थकीत दंडाची वसुली करण्यात आली.
या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांना स्पष्ट संदेश दिला आहे की दारू पिऊन वाहन चालवणे हा गुन्हा असून त्यासाठी कडक कारवाई होणार आहे.