कांचन पाटील जिल्ह्यातील पाहिल्या पोलिस
नागपूर : लोहमार्ग नागपूर पोलिस दलातील महिला अंमलदार कांचन पाटील यांची विदेश मंत्रालयात निवड झाली आहे. दिल्ली येथे विशेष प्रशिक्षण घेऊन त्या विदेशात सेवा देणार आहेत. लोहमार्ग पोलिस दलाच्या इतिहासात प्रथमच एका पोलिस कर्मचाऱ्याची निवड झाली आहे. लोहमार्ग नागपूर जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे.
कांचन पाटील ह्या नागपूर लोहमार्ग पोलिस दलात सन 2006 मधे रुजू झाल्या आहेत. त्यांना संगणकीय ज्ञानाचा अनुभव असल्यामुळे पोलिस स्टेशन तसेच पोलिस अधीक्षक कार्यालय येथे त्यांनी उत्तमप्रकारे कामकाज सांभाळले आहे.
त्या कामात अत्यंत प्रामाणिक व हुशार असल्याने त्यांना विदेश मंत्रालयाने दिल्ली येथे मुलाखतीसाठी पाचारण केले. त्यात त्यांनी बाजी मारली व नागपूर लोहमार्ग पोलिस दलातून विदेश मंत्रालयात जाणार्या त्या पाहिल्या कर्मचारी तसेच पाहिल्या महिला अंमलदार ठरल्या आहेत.
त्यांना तत्कालीन पोलिस अधीक्षक श्री. एम. राजकुमार यांनी मार्गदर्शन केले.