Published On : Sat, Mar 21st, 2020

दुकाने बंद करा आणि घरी जा; नागपुरात तुकाराम मुंढे यांनी केली पाहणी

नागपूर: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊन स्थितीची पाहणी करण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी सकाळी शहराचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान आढळलेली उघडी दुकाने व टपऱ्यांना त्यांनी बंद करायला लावले. तसेच गर्दी केलेल्या नागरिकांनी घरी जाण्याचा सल्ला दिला.

सोमवारी सकाळी तुकाराम मुंढे यांनी शहरातील सीताबर्डी, महाल, मोमिनपुरा या भागाचा दौरा केला. या पाहणीत त्यांना काही लहान दुकाने सुरू असल्याचे दिसले. त्यावर तात्काळ कारवाई करीत त्यांनी दुकाने बंद करायला लावून घरी जाण्याचा सल्ला दिला. मोमिनपुरा भागात सुरू असलेल्या भाजीबाजारातील गर्दी पाहून त्यांनी, जास्त गर्दी करू नका असेही उपस्थितांना सांगितले.