Published On : Thu, Aug 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात महिलांना कर्जाचे आमिष; ७ कोटी ६८ लाखांच्या आर्थिक फसवणुकीचा पर्दाफाश!

मुख्य सूत्रधार मंदा गुमगावकर अटकेत
Advertisement

नागपूर : महिलांना कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून तब्बल ७ कोटी ६८ लाख रुपयांचे व्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तहसील पोलिसांनी मुख्य आरोपी मंदा गुमगावकर हिला अटक केली असून न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील फरार आरोपी शुभम याचा शोध सुरू असून या व्यवहारांचा सायबर फसवणुकीशी संबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तहसील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदा गुमगावकर हिने सुमारे ३९ महिलांना सहकारी संस्था आणि बचत गटामार्फत सहज कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी प्रत्येक महिलेकडून दोन हजार रुपये तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे घेतली. त्यानंतर या कागदपत्रांच्या आधारे संबंधित महिलांच्या नावाने एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँकेत बँक खाती उघडण्यात आली.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महिलांना कोणतीही माहिती न देता या खात्यांमधून तब्बल ७ कोटी ६८ लाख रुपयांचे व्यवहार करण्यात आल्याचे तपासात उघड झाले. शांतिनगर परिसरातील एका महिलेच्या नावाने उघडलेल्या खात्यातूनही १७ लाख ८५ हजार रुपयांचे व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

तहसील आणि शांतिनगर पोलिसांनी संयुक्त तपास करत मुख्य आरोपीला अटक केली. प्राथमिक तपासात ही बँक खाती सायबर फसवणुकीतील ‘म्यूल अकाउंट’ म्हणून वापरण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

दरम्यान, न्यायालयाने आरोपी मंदा गुमगावकर हिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून फरार आरोपी शुभमचा शोध सुरू आहे. या प्रकरणामागील संपूर्ण सायबर नेटवर्क आणि इतर आरोपींचा सहभाग तपासला जात असल्याची माहिती तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.