नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल झालेल्या हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. मित्रांसोबत सुरू असलेली दारू पार्टी एका युवकाच्या जीवावर बेतली. किरकोळ वादातून संतापलेल्या दोन मित्रांनी 32 वर्षीय युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
मृत युवकाचे नाव अंकुश किशोर शेंडे (रा. पंचशील नगर, ईसासनी रोड) असे असून तो बेरोजगार होता. त्याला दारूचे व्यसन असल्याने कौटुंबिक परिस्थितीही बिघडली होती. काही वर्षांपूर्वी पत्नीही त्याला सोडून माहेरी गेल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 मे रोजी सायंकाळी 5 ते 7.15 वाजताच्या दरम्यान एमआयडीसी परिसरातील एका धार्मिक स्थळाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर अंकुश हा मित्रांसोबत बसून दारू पित होता. याचवेळी कोणत्या तरी कारणावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपी विक्की उर्फ दद्दू संजय मोहोड (28) आणि मुकुल रोवतेल यांनी अंकुशवर मोठ्या दगडांनी हल्ला केला.
डोक्यावर आणि शरीरावर गंभीर मार लागल्याने अंकुशचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विक्की मोहोड याला रविवारी अटक केली होती. त्याला न्यायालयाने 22 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर फरार आरोपी मुकुल रोवतेल यालाही सोमवारी अटक करण्यात आली असून त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





