Published On : Tue, Sep 2nd, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर-कोलकाता इंडिगो फ्लाइटची इमर्जन्सी लँडिंग; ‘हे’ कारण आले समोर

Advertisement

नागपूर : नागपूरहून कोलकात्याकडे निघालेल्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये अचानक गोंधळ उडाला. उड्डाण घेतल्यानंतर थोड्याच वेळात विमानाला आकाशात पक्ष्यांची टक्कर बसली. पायलटने तत्काळ ही बाब नियंत्रण कक्षाला कळवली आणि नागपूर विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केली.

इंडिगोची ही फ्लाइट क्रमांक 6E812 होती. विमानात १६० ते १६५ प्रवासी होते. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत आणि कोणतीही जीवितहानी झालेली नाही. लँडिंगनंतर विमानाची तपासणी सुरू असून इंजिनियरिंग टीम विमानाच्या स्थितीचा अभ्यास करत आहे.

अलिकडच्या काही काळात देशात विमानाशी संबंधित दुर्घटना व तांत्रिक बिघाडांच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. नुकतेच ९ ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती उपखंडातील कटफळ गावाजवळ एक ट्रेनिंग एअरक्राफ्ट कोसळले होते. यात पायलटला किरकोळ दुखापत झाली होती. त्याआधी १९ जून रोजी दिल्ली-लेह इंडिगो फ्लाइट 6E2006 ला तांत्रिक अडचणीमुळे आपत्कालीन लँडिंग करावी लागली होती.

Gold Rate
Aug 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,900 /-
Gold 22 KT ₹ 1,42,800 /-
Silver/Kg ₹ 2,36,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याचबरोबर २ जून रोजी रांचीमध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती. पटना-कोलकाता वाया रांची मार्गावरील फ्लाइटला गिधाड धडकले होते, तेव्हा विमानात १७५ प्रवासी होते. तेव्हाही पायलटने शिताफीने लँडिंग करत सर्वांचा जीव वाचवला होता.

सध्या नागपूर विमानतळावर घडलेल्या घटनेनंतर सर्व प्रवासी सुरक्षित असल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र वारंवार घडणाऱ्या अशा अपघातांनी हवाई सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Advertisement
Advertisement
SIR प्रक्रिया में गड़बड़ी के आरोप, युवा कांग्रेस आक्रामक #vidarbhanews #nagpur #news  #nagpurnews

SIR प्रक्रिया में गड़बड़ी के आरोप, युवा कांग्रेस आक्रामक #vidarbhanews #nagpur #news...

बकाया बिलों को लेकर ठेकेदारों का अर्धनग्न आंदोलन #nagpurnews #andolan #newsupdate #maharashtranews

बकाया बिलों को लेकर ठेकेदारों का अर्धनग्न आंदोलन #nagpurnews #andolan #newsupdate #maharashtranews

सड़क की बदहाली पर छात्राओं की रिपोर्टिंग #maharashtranews #raigad #newsupdate #maharashtra #news

सड़क की बदहाली पर छात्राओं की रिपोर्टिंग #maharashtranews #raigad #newsupdate #maharashtra #news

महिला से बैग छीनकर भागने वाला आरोपी 24 घंटे में गिरफ्तार #nagpurnews #crimenews #accusedarrested

महिला से बैग छीनकर भागने वाला आरोपी 24 घंटे में गिरफ्तार #nagpurnews...

बावनकुळे के हाथों अत्याधुनिक चिकित्सा सुविधाओं का शुभारंभ

बावनकुळे के हाथों अत्याधुनिक चिकित्सा सुविधाओं का शुभारंभ

राज ठाकरे के सवाल पर रविंद्र चव्हाण ने साधी चुप्पी #vidarbhanews #nagpur #newsupdate #nagpurnews

राज ठाकरे के सवाल पर रविंद्र चव्हाण ने साधी चुप्पी #vidarbhanews #nagpur...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges