
नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना उघडकीस आली आहे. कारागृहाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यालाच सुमारे तीन लाख रुपयांची चरस बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे कारागृहात अमली पदार्थांचा पुरवठा करण्यामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ जुलै रोजी सकाळी नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर नियमित तपासणी सुरू असताना कारागृह कर्मचारी विकास सहारे याची झडती घेण्यात आली. या तपासणीत त्याच्याकडून ३९ ग्रॅम चरस जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या चरसची किंमत सुमारे ३ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासणीत आरोपीकडून ७ ग्रॅम वजनाच्या निळ्या रंगाच्या संशयित गोळ्या, पाच ब्लेड आणि इतर साहित्य देखील जप्त करण्यात आले. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख २५० रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे.
कारागृह हवालदाराने दिलेल्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) तसेच कारागृह अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
आरोपी अमली पदार्थ कारागृहात नेमके कोणासाठी आणि कोणत्या उद्देशाने घेऊन जात होता, तसेच या प्रकरणामागे इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास धंतोली पोलीस करत आहेत. या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्था आणि तपासणी प्रक्रियेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
विरोध या अपशब्द? लोकतंत्र में मर्यादा की सीमा क्या है? | Nagpur...
Nagpur : सड़क में गड्ढे या गड्ढों में सड़क? जनता त्रस्त! जिम्मेदार...
संविधान चौक पर युवाओं का महासैलाब! कई समर्थक हिरासत में, लेकिन जोश...
NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | #topnews #maharashtranews #vidarbhanews #nagpurnews...
शादी का झांसा देकर दुष्कर्म का आरोप #NagpurNews #CrimeNews #PoliceAction #LatestNews #NewsUpdate




