Published On : Fri, Feb 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर देशाचे नवे औद्योगिक हब; दावोस येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विक्रमी गुंतवणूक करार

Advertisement

नागपूर – स्वित्झर्लंडमधील दावोस येथे पार पडलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) बैठकीने विदर्भ आणि विशेषतः नागपूर प्रदेशासाठी औद्योगिक विकासाची नवी दारे उघडली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महत्त्वपूर्ण करारांमुळे नागपूरने गुंतवणुकीच्या बाबतीत ऐतिहासिक टप्पा गाठला असून, प्रदेशाच्या आर्थिक भवितव्याला नवी दिशा मिळाली आहे.

दावोस येथील बैठकीत झालेल्या विविध सामंजस्य करारांद्वारे नागपूर प्रदेशासाठी तब्बल ५ लाख ९२ हजार ७४६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली आहे. या भरीव गुंतवणुकीमुळे नागपूर आणि विदर्भातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून, सुमारे ४७ हजार तरुणांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

Gold Rate
June 152026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,300 /-
Gold 22 KT ₹ 1,40,300 /-
Silver/Kg ₹ 2,51,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

११ आघाडीच्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार-
नागपूर विभागातील औद्योगिक, तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी ११ प्रमुख देशी-विदेशी कंपन्यांशी सामंजस्य करार (MoU) करण्यात आले आहेत. या गुंतवणुकीचा भर प्रामुख्याने हरित ऊर्जा, पोलाद, धातू प्रक्रिया, इलेक्ट्रॉनिक्स, सौर ऊर्जा, ऑटोमोटिव्ह आणि अन्न प्रक्रिया उद्योगांवर आहे. यामुळे नागपूरचा औद्योगिक पाया अधिक भक्कम होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नागपूर आज गुंतवणूकदारांसाठी विश्वासार्ह आणि पसंतीचे केंद्र ठरत आहे. समृद्धी महामार्ग, मेट्रो रेल्वे, लॉजिस्टिक सुविधा आणि आधुनिक पायाभूत रचना यामुळे उद्योगांना आवश्यक असलेली अनुकूल परिस्थिती नागपूरमध्ये निर्माण झाली आहे.

या मोठ्या गुंतवणुकीमुळे नागपूर केवळ विदर्भाचेच नव्हे, तर देशातील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून पुढे येणार आहे. स्थानिक तरुणांचे इतर शहरांकडे होणारे स्थलांतर थांबेल, रोजगारनिर्मितीला गती मिळेल आणि विदर्भाच्या आर्थिक समृद्धीत लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Advertisement
धर्मांतरण के दबाव और शोषण का आरोप, सोनेगांव थाने में केस दर्ज.. #nagpurnews #crime #latestnews

धर्मांतरण के दबाव और शोषण का आरोप, सोनेगांव थाने में केस दर्ज.....

स्मार्ट मीटर पर शिवसेना-मनसे आमने-सामने.. #maharashtranews #smartmeter #latestnews

स्मार्ट मीटर पर शिवसेना-मनसे आमने-सामने.. #maharashtranews #smartmeter #latestnews

आशा वर्कर्स के सामूहिक इस्तीफे से संकट.. #maharashtranews #ashaworkers #latestnews

आशा वर्कर्स के सामूहिक इस्तीफे से संकट.. #maharashtranews #ashaworkers #latestnews

गोंदिया में 123 इमारतें बनीं खतरा.. #maharashtranews #gondiya #newsupdate

गोंदिया में 123 इमारतें बनीं खतरा.. #maharashtranews #gondiya #newsupdate

सपकाळ का भाजपा और केंद्र पर हमला.. #maharashtranews #congressvsbjp #politicsnews #latestnews

सपकाळ का भाजपा और केंद्र पर हमला.. #maharashtranews #congressvsbjp #politicsnews #latestnews

श्रीनगर में तिरंगा न होने पर नेहरु जिम्मेदार बोंडे.. #maharashtranews #anilbonde #amravati

श्रीनगर में तिरंगा न होने पर नेहरु जिम्मेदार बोंडे.. #maharashtranews #anilbonde #amravati

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges