Published On : Thu, May 7th, 2020

नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी येते विशेष बुद्धवंदना व धम्मप्रवचन आने झाली बुद्ध पौर्णिमा साजरी

Advertisement

नागपूर : संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती ( बुद्ध पौर्णिमा) निमित्त नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी येथे दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी विशेष बुद्धवंदना घेतली व धम्मप्रवचन केले.

यावेळी दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, ऐन. आर. सूटे, सुधीर फुलझेले तर एडवोकेट आनंद फुलझेले यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला पुष्प अर्पण करून वंदन केले.

यावेळी दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे म्हणाले की, आज तथागत गौतम बुद्धांच्या करूनेनेच जगातून कोरोणा रोग नष्ट होईल. तथागत बुद्धांचा धम्म हा विज्ञानावर आधारित आहे आणि विज्ञानामुळेच जगाचे कल्याण झाले आहे, हे हजारो वर्षापासून सिद्ध होत आहे. इतिहासात प्रथमच तथागत भगवान गौतम बुद्धांच्या बुद्ध पौर्णिमेला कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे पवित्र दीक्षाभूमी चे द्वार बंद ठेवण्यात आले.

यापूर्वीच दीक्षाभूमी स्मारक समितीने देशातील तमाम बौद्ध, आंबेडकरी जनतेला आव्हान केले होते, की सोशल डिस्टन्स चे पालन करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व बुद्ध पूर्णिमा आपण आपल्या घरीच राहून तथागत बुद्धाला पुष्प अर्पण करून व दीप प्रज्वलित करून वंदन करू आणि या दीक्षाभूमी स्मारक समितीच्या विनंतीला देशातील तमाम आंबेडकरी व बौद्ध जनतेनी सन्मान देत बुद्ध जयंती साजरी केली, याकरिता दीक्षाभूमी स्मारक समिती त्यांचे आभार मानत आहेत.

यावेळी भंते सुगत बोधी, सिद्धार्थ म्हैसकर, निळु भगत, पापा मून, पत्रकार विजय गजभिये उपस्थित होते.