Advertisement
नागपूर : फेंगलचा प्रभाव ओसरल्याने उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात थंडीने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी नागपूरचे किमान तापमान ९.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हा या हंगामातील सर्वात थंड दिवस ठरला.
संपूर्ण विदर्भात नागपूर आणि गोंदिया हे सर्वात थंड जिल्हे राहिले. थंडीचा असा प्रभाव आहे की, लोक दिवसाही उबदार कपडे घालून बाहेर पडत आहेत.
गेल्या पाच दिवसांपासून नागपुरात थंडीचा पूर्ण परिणाम दिसून येत आहे.
थंड वाऱ्यांचा प्रभाव असा आहे की, आता नागपुरातील पारा 10 अंशांच्या खाली गेला. गुरुवारी नागपूरचे किमान तापमान ९.८ अंश इतके नोंदवले गेले. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात नागपूर सर्वात थंड शहर म्हणून नोंदविले गेले आहे.