Published On : Tue, Jun 2nd, 2015

नागपूर : घर बांधतांना पावसाळी पाण्याचे नियोजन न केल्यास दंड वसूल करा – महापौर

Advertisement

NMC Envorment News photo 1 June 2015
नागपूर। ५ जून हा दिवस सर्वत्र जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मनपा मध्य साजरा करण्याच्या दृष्टीने महापौर प्रवीण दटके यांनी करावयाच्या पूर्वतयारीसाठी मनपा पदाधिकारी, सर्व झोन सभपती, विभागप्रमुख व सहा. आयुक्त कार्यकारी अभियंता यांच्या समवेत चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. बैठकी ला स्थायी समिती सभापती रमेश सिंगारे, सत्तापक्ष नेता, दयाशंकर तिवारी, झोन सभापती जयश्री वाडीभस्मे, वर्षा ठाकरे, सारिका नांदुरकर, लता यादव, मनीषा कोठे, प्रभा जगनाडे, उपयुक्त आर. झेड. सिद्दिकी, अतिउपयुक्त प्रमोद भुसारी व जयंत दांडेगावकर, उपसंचालक (आरोग्य) डॉ. मिलिंद गणवीर यांच्या सह सर्व विभाग प्रमुख, सहा. आयुक्त कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.

या बैठकीत सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी म्हणाले ज्या ईमारत मालकांनी मनपा परिसरात बांधकाम पूर्ण केलेले आहे आणि नियमाप्रमाणे रेन वाटर हार्वेस्टिंगची व्यवस्था केलेली नाही अशा ईमारतीचे सर्वे करून त्यांच्यावर कार्यवाही करण्याकरिता झोन निहाय पथक निर्माण करण्याची सूचना केली. सूचनेवर महापौरांनी या बैठकीत सर्व झोनच्या सहाय्यक आयुक्त यांना असे निर्देश दिलेत की, ज्या इमारतधारकांनी पाऊस पाणी संकलन करण्यासाठी (रेन वाटर हार्वेस्टिंग) ची व्यवस्था केलेली नाही, अश्यांना 1 महिन्याची नोटिस देवून या अवधित पाऊस पाणी संकलनाची व्यवस्था करण्याची संधी द्यावी जे ईमारतधारक या अवधीत रेन वाटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करणार नाही त्यांच्यावर नगररचन नियमाप्रमाणे दंडात्मक कारवाही करण्याचे निर्देश महापौर यांनी यावेळी सर्व झोनच्या सहाय्यक आयुक्तांना दिलेत.

त्याचप्रमाणे ५ जून मनपा तर्फे पर्यावरण दिन साजरा करण्यात येणार असून यानंतरही वर्षभर पर्यावरण रक्षणाचे विविध कार्यक्रम झोन स्तरावर आयोजित करण्यात येणार आहेत याबाबत पत्येक झोननी पर्यावरणाबाबत विविध कार्यक्रम झोन सभापती व सहाय्यक आयुक्तांच्या समन्वयाने रूपरेषा व नियोजन ३ जून पावेतो तयार करण्याचे निर्देश सर्व झोनच्या सहाय्यक आयुक्तांना महापौर यांनी दिलेत.