Published On : Sat, Jul 4th, 2015

नागपूर : आदर्श नागरिकांचे आदर्श गाव सर्वाच्या प्रयत्नातून शक्य : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी


Nitin Gadkari in Pachgao  (2)
नागपूर।
 केंद्र शासनाच्या सांसद आर्दश ग्राम योजनेअंतर्गत केंद्रीय भूपृष्ट वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेल्या नागपूरच्या उमरेड तालुक्यातील पाचगाव येथाल विविध विकास कार्यांच्या शुभारंभाप्रसंगी आर्दश नागरिकांचे आर्दश गाव हे सर्वांच्या प्रयत्नातून असल्याचे प्रतिपादन आज केले.

पाचगाव येथे संसदग्राम योजनेअंतर्गत सुमारे 25 कोटींच्या 15 विकासकार्यांचा लोकार्पण सोहळा आज केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते पार पडला. ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमाचा भाग असलेल्या व सुमारे 25 लक्ष तरतूद असलेल्या ई- लायब्ररी व फ्री –वाय फाय सुविधेचा प्रारंभ करणारे पाचगाव हे देशातील पहिले गाव म्हणून नावारुपास आले आहे. डिजिटल लायब्ररीमूळे गावातील तरुण मूलांचा संपर्क जगाशी होऊन, त्यांनी या वाचनालयाचा फायदा ज्ञानार्जनासाठी पूरेपूर करुन घ्यावा, असे आवाहन यावेळी नितीन गडकरी यांनी केले.

प्रधानमत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत पाचगावमध्ये सुरु होणा-या विविध विकासाकार्याची माहिती त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली. पाचगावचा विकास आराखडा देशामध्ये सर्वप्रथम केंद्रशासनाकडे पोहचला असल्याचे नमूद करुन पाचगावाच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

पाचगावमध्ये पहिल्या चरणातील 25 कोटींचे कामे मंजूर झाली असून. यामध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम, नवीन पाणी पुरवठा योजना, डिजिटल इंडिया अंतर्गत ई- लायब्ररी व फ्री –वाय फाय, क्रिडांगण विकास, वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम, इत्यादी कामांचा समावेश आहे. या सर्व विकासकार्यांचा भूमीपूजन व लोकार्पण सोहळा नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, महाराष्ट्र शासनाचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर व इतर मान्यवरांच्या उपस्थित. संपन्न झाला.

महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्रशिक्षण तसेच शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अनुत्तीर्ण मुलांना त्यांचे अंगभूत कौशल्ययुण ओळखून कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन स्वावंलंबी करण्याकडे महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न चालू असल्याचे सांगितले. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी पाचगाव येथील ग्रामस्थांना स्वच्छ पाणी पुरवठयासाठी, 7 लक्ष रुपयांची तरतूद केली असल्याचे सांगून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी 20 लक्ष रुपयेही त्यांच्या मंत्रालयामार्फत देण्यात आल्याचे आवर्जुन सांगितले. गावातील गरीब नागरिकांना वैयक्तिक शौचालयासाठी व हगणदारीमुक्त गावासाठी निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Nitin Gadkari in Pachgao  (1)
याप्रसंगी सेंद्रीयशेती कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आले होते. केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेचे संचालक डाँ. लदानिया यांनी शेतक-यांना जैविक शेतीचे प्रशिक्षण तसेच लिंबूवर्गीय फळांचे संवर्धन करण्यासाठी राबविण्यात येणा-या उपाययोजना यांविषयी माहिती दिली.

यावेळी उपस्थित रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी सुद्धा पाचगावच्या विकासासाठी त्यांच्या खासदार निधीतून 50 लक्ष रुपये देण्याची घोषणा केली. सर्वांनी या विकासकार्यामध्ये सोबतीने सहभागी होऊन . पाचगाव आदर्श गाव बनवूया, असा संकल्प तुमाने यांनी यावेळी केला.

या कार्यक्रमाला नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नागपूर जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी शिवाजी जोंधळे, विधान परिषद आमदार अनिल सोले, उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर पारवे, पाचगाव ग्राम पंचायतचे सदस्य , पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.