Published On : Tue, Aug 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर सिपिंच्या पथकाची ताज पान पॅलेसवर धाड; हुक्का साहित्य अन् खर्रा मशीन जप्त

Advertisement

नागपूर : प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि हुक्का साहित्याविरोधात नागपूर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या विशेष पथकाने सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोठा ताजबाग परिसरात असलेल्या ताज पान पॅलेसवर छापा टाकून हुक्का पॉट, हुक्क्याच्या नळ्या, विविध फ्लेवर-सिगारेट तसेच खर्रा बनविण्याची विद्युत मशीन जप्त केली.

विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक भगवान कोळी हे पथकासह परिसरात गस्त घालत असताना रात्री सुमारे ३ वाजता ताज पान पॅलेसमध्ये संशयास्पद हालचाली आढळून आल्या. पोलिसांची चाहूल लागताच पान पॅलेसचा मालक फारुख शेख मोईनुद्दीन आणि अन्य काही जण घटनास्थळावरून पसार झाले.

दरम्यान, दुकानात काम करणारा मोहसीन शेख मेहमूद पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर दुकानाची झडती घेतली असता २ हुक्का पॉट, २३ हुक्का नळ्या आणि विविध कंपन्यांचे ८० हुक्का फ्लेवर-सिगारेट आढळून आले. याशिवाय खर्रा तयार करण्याची विद्युत मशीन आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थही पोलिसांनी जप्त केले.

या प्रकरणी फरार मालक फारुख शेख मोईनुद्दीन आणि दुकानातील कर्मचारी मोहसीन शेख मेहमूद या दोघांविरुद्ध सक्करदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

दरम्यान, जप्त करण्यात आलेले प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि हुक्का साहित्य नेमके कुठून आणले जात होते, तसेच या व्यवसायामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा पोलीस तपास करीत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.