
नागपूर – हिंगणा एमआयडीसी परिसरातील कपूर कारखान्यात बुधवारी दुपारी सुमारे ३ वाजता भीषण आग लागली. आग इतकी भयंकर होती की धुराचे लोट दूर-दूर पर्यंत पसरले होते, ज्यामुळे परिसरात दाट धूरवातावरण निर्माण झाले.
आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या ५ गाड्या त्वरित घटनास्थळी दाखल झाल्या असून, अग्निशमन दल मोठ्या संख्येने कामाला लागले आहे. कारखान्याजवळ मर्सिडीज कारचे शोरूम असल्याने सुरक्षा दृष्टीने अधिक काळजी घेतली जात आहे.
सध्या आग विझवण्यात ६० टक्के यश मिळाले असून उर्वरित आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम जोरात सुरू आहे. आग लागल्यावेळी कारखान्यात कर्मचारी नव्हते कारण कंपनी बुधवारी बंद होती.त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील तपासणी सुरू आहे.









