Published On : Wed, May 2nd, 2018

हवाला रॅकेटमधील ३ कोटींवर पोलिसांचाच डल्ला?, खबरी अटकेत

Man Arrested

Representational Pic

नागपूर: नागपूरमधील हवाला प्रकरणातील सुमारे तीन कोटी रुपयांवर पोलिसांनीच डल्ला मारल्याचा संशय आहे. या प्रकरणात पोलिसांना टीप देणाऱ्या चार जणांना महाबळेश्वरमधून सातारा पोलिसांनी अटक केली असून लुटलेल्या पैशांनी मौजमजा करण्यासाठी ते चौघे महाबळेश्वरला आले होते.

गेल्या आठवड्यात नागपूरच्या प्रजापतीनगर चौकात कारमध्ये आढळलेल्या हवालाच्या तीन कोटींच्या प्रकरणात नवा ‘ट्विस्ट’ आला होता. पोलिसांनी कारमधून अडीच कोटी रुपयांची रक्कम लुटल्याची तक्रार नंदनवन पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. तीन पोलीस व टीप देणाऱ्या दोघांनी ही रक्कम लुटल्याचे तक्रारीत म्हटले होते. हवालाची टीप देणारे रवि माचेलवार व सचिन पडगीलवार दोघेही बेपत्ता असल्याने रोख लुटण्यात आल्याचा संशय अधिक बळावला होता.

नागपूरमधील प्रकरणाशी संबंधित चार आरोपी महाबळेश्वरमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नागपूर पोलिसांनी याची माहिती सातारा पोलिसांना दिली. यानंतर सातारा पोलिसांनी महाबळेश्वर परिसरातील विविध लॉजमध्ये चौकशी सुरु केली. सनी हॉटेलमध्ये चार तरुण मुक्कामाला असून त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे महाबळेश्वर पोलिसांना समजले. महाबळेश्वर पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी या संशयितांच्या रूमवर धडक देत त्यांची चौकशी केली. चौकशीत त्या चौघांचा नागपूरमधील प्रकरणाशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले.

Advertisement

नागपूर हवालाकांडातील एवढी मोठी रक्कम या संशयितांनी नेमकी कुठे ठेवली, याचाही शोध पोलीस घेत आहेत. त्यांच्याकडून अडीच लाख रुपये जप्त केल्याचे समजते. या चौघांना बुधवारी सकाळी नागपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्या अटकेमुळे पोलिसांचा या गुन्ह्यात सहभाग होता का, तीन कोटी रुपयांवर कोणकोणत्या पोलीस अधिकाऱ्यांनी डल्ला मारला, याचा उलगडा होणार आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement