Published On : Tue, Apr 28th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर हज हाऊसमध्ये छत्तीसगडच्या हज यात्रेकरूंना विशेष किटचे वितरण

Advertisement

​नागपूर: हज यात्रा २०२६ च्या पार्श्वभूमीवर नागपूर येथील हज हाऊसमध्ये छत्तीसगडमधील हज यात्रेकरूंना प्रवासासाठी आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. छत्तीसगड हज कमिटीचे अध्यक्ष मिर्जा एजाज बेग आणि छत्तीसगड सरकारचे हज कमिटी सीइओ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

छत्तीसगड सरकारद्वारे सर्व यात्रेकरूंसाठी विशेष किटची व्यवस्था करण्यात आली असून, यामध्ये मेडिकल साहित्यासह प्रवासासाठी लागणाऱ्या इतर महत्त्वाच्या वस्तूंचा समावेश आहे. यात्रेकरूंना प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांना विशेष स्वरूपाचे ओळखपत्र (आयकार्ड) देखील देण्यात आले आहे.

​या प्रसंगी नागपूर भाजपचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद केले की, भारत सरकार ज्याप्रमाणे यात्रेकरूंसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देते, त्याच धर्तीवर छत्तीसगड भाजप सरकारनेही यात्रेकरूंना किट देऊन त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यांनी यावेळी नागपूरच्या हज हाऊसमध्ये सुविधा वाढवण्यासाठी भाजप सरकारने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली, तसेच मागील हज कमिटीच्या अध्यक्षांनी केलेल्या कार्याचा गौरव केला.

यावेळी दयाशंकर तिवारी यांनी सर्व हज यात्रेकरूंना आवाहन केले की, सर्व यांत्रिकरांनी मक्का-मदीना येथे आपल्या भारत देशाच्या सुख, समृद्धी, यश, वैभव आणि अमन (शांतता) कायम राहण्यासाठी विशेष दुवा करावी.” या कार्यक्रमाला हज कमिटीचे अध्यक्ष मिर्जा एजाज बेग आणि त्यांचे सहकारी, तसेच नागपूर भाजप अल्पसंख्याक आघाडीचे प्रमुख असलम खान यांची उपस्थिती होती. उपस्थित सर्व मान्यवरांनी हज यात्रेकरूंना सुखद आणि मंगलमय प्रवासासाठी शुभेच्छा देऊन रवाना केले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.