Published On : Mon, Mar 20th, 2017

ग्रीन बस ठरतेय मनपाच्या सार्वजनिक वाहतुक सेवेत मानाचा तुरा

Advertisement

Green Bus
नागपूर:
नागरिकांना दळण-वळणासाठी सार्वजनिक वाहतुक वापरण्यास प्रोत्साहीत करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिका प्रयत्नशील आहे. मनपाच्या वाहतुक विभागाच्या ताफ्यात दाखल झालेल्या ग्रीन बसमुळे सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत नागपूरकरांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळत आहे. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी मनपा स्थाई समिती अध्यक्ष संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी रविवारी ग्रीन बसचा प्रवास अनुभवला. तसेच बसमध्ये असलेल्या सोयी-सुविधांची माहिती यावेळी त्यांची आवर्जून जाणून घेतली. प्रसंगी प्रामुख्याने माजी महापौर आमदार अनिल सोले, नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपाच्या वाहतुक विभागाचे व्यवस्थापक शिवाजी जगताप यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

सध्या आपली बसच्या ताफ्यात 5 ग्रीनबस असून लवकरच आणखी बसेसची भर यात पडणार आहे. ग्रीन बसमध्ये नागरिकांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांसोबतच सुरक्षेच्या दृष्टीनेही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय ही बस इथेनॉल या फ्युअलद्वारे संचालित होणार असल्याने प्रदूषणचे प्रमाण कमी होणार आहे. ग्रीन बस ही वातानुकुलीत असून प्रवासी क्षमता 34 सिट आहे तसेच दिव्यांग (अपंग)नागरिकांकरीता व्हील चेअरद्वारे बस मध्ये चढण्याकरीता रॅम्पची व्यवस्था आहे. प्रवाशांच्या माहितीकरीता बसच आतमध्ये मार्ग व थांब्याची ‘माहिती प्रदर्शित होणार आहे.

त्याचप्रमाणे चालकाद्वारे ध्वनिक्षेपण यंत्राच्याद्वारे माहिती देण्याची सोय आहे. प्रवासी सिट जवळ असलेल्या रांगेजवळ पोल असून त्यामध्ये येणा-णा थांबव्यावर बस थांबविण्याबाबत ईशारा देण्यासाठी बटन ची व्यवस्था करण्यात आली आहे. बसमध्ये जी.पी.एस. ची सोय असल्याने मनपाचे नियंत्रण कक्षातूनच बसचे लोकेशन कळेल. भविष्यात सुरु होणारे ‘मेट्रो व नागपूर शहरबस मध्ये प्रवास करणा-या प्रवासी करीत कॉमन मोबालिटी कोड ‘ ची व्यवथा करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Gold Rate
Thursday 13 March 2025
Gold 24 KT 87,100 /-
Gold 22 KT 81,000 /-
Silver / Kg 99,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement