Advertisement
नागपूर : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असला, तरी नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबई वेधशाळेने जारी केलेल्या ६ ते १० जुलैच्या हवामान अंदाजानुसार, ६ जुलै रोजी नागपूर जिल्हा ग्रीन अलर्टमध्ये असून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे ७ ते १० जुलैदरम्यानही नागपूरसाठी कोणताही यलो, ऑरेंज किंवा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे अतिवृष्टीचा धोका नसला तरी अधूनमधून पावसाच्या सरी आणि ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि घाट परिसरातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




