Published On : Tue, Sep 29th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर पदवीधर मतदारसंघात राजकीय रणधुमाळी; अभिजित वंजारी मैदानात, भाजपचा ‘पत्ता’ अजून गुलदस्त्यात!

Advertisement

नागपूर पदवीधर मतदारसंघात राजकीय रणधुमाळी; अभिजित वंजारी मैदानात, भाजपचा ‘पत्ता’ अजून गुलदस्त्यात!

नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. काँग्रेसने अभिजित वंजारी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यांनी मतदारसंघात प्रचार आणि मतदारांच्या भेटीगाठींना सुरुवात केली आहे. वंजारी हे ५ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

उमेदवारी निश्चित होताच वंजारी यांनी निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. देशातील अलीकडील राजकीय घडामोडींचा निवडणुकीवर परिणाम होईल, असा दावा त्यांनी केला आहे. ही निवडणूक सरकारसाठी जनमताची परीक्षा असून, राज्यातील जनता कोणाच्या बाजूने आहे, याचे संकेत या निवडणुकीच्या निकालातून मिळतील, असे वंजारी यांनी म्हटले आहे.

Gold Rate
Sept 29,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 47,300 /-
Gold 22 KT ₹ 1,36,5700 /-
Silver/Kg ₹ 2,22,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दुसरीकडे, भाजपने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नसल्याने पक्षाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र संभाव्य उमेदवार म्हणून सुधाकर कोहळे यांनी आपली तयारी सुरू केली आहे. उमेदवारी कोणाला मिळाली तरी भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी काम करणार असल्याचे सांगत त्यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. नुकतीच त्यांनी जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या भेटी घेत त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.

भाजपमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढत असतानाच संघ परिवारातूनही नाव पुढे आले आहे. विश्व हिंदू परिषदेच्या मंदिर आयामचे विदर्भसह प्रांतप्रमुख अॅड. रमण सेनाड यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. गेल्या ५० वर्षांपासून संघ परिवाराचे आणि ३० वर्षांपासून भाजपचे काम करत असल्याचे सांगत, यापूर्वी अनेकदा उमेदवारी मागूनही संधी मिळाली नसल्याचे सेनाड यांनी म्हटले आहे. यावेळी पक्ष नेतृत्व आपल्याला संधी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Advertisement

काँग्रेसचा उमेदवार मैदानात उतरला असताना भाजपचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. त्यामुळे फडणवीस-गडकरींच्या गृहजिल्ह्यातील या प्रतिष्ठेच्या मतदारसंघात भाजप कोणावर विश्वास दाखवणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात वाढली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.