Published On : Thu, Aug 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

गिट्टीखदानमधील घरफोडीचा छडा; एक आरोपी अटकेत, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Advertisement

नागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गायकवाड लेआउट येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यात सहभागी असलेला अल्पवयीन साथीदार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

हजारी पहाड येथील गायकवाड लेआउटमधील गायत्री कॉलनीत राहणारे धम्मशील हे ३१ जुलैच्या रात्री कुटुंबासह पुण्याला गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सुमारे साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तक्रार दाखल होताच गिट्टीखदान पोलिसांनी तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे अंबाझरी परिसरात सापळा रचून सागर वर्मा याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून चोरीची एक दुचाकीही जप्त करण्यात आली. ही दुचाकी पाचपावली परिसरातून चोरी केल्याची कबुली त्याने दिली.

पुढील चौकशीत सागर वर्माने एका अल्पवयीन साथीदारासह गायकवाड लेआउटमधील घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्या निशाणदेहीवरून पोलिसांनी सुमारे साडेतीन लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला.

Advertisement

दरम्यान, या गुन्ह्यातील फरार अल्पवयीन आरोपीचा शोध गिट्टीखदान पोलीस घेत असून, त्याला लवकरच ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांनी दिली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.