Published On : Fri, Jul 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई; १.१२३ किलो गांजासह एक अटक, एक फरार

Advertisement

नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई करत धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तकिया झोपडपट्टी परिसरातून १.१२३ किलो गांजा जप्त केला. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून एका आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जुलै रोजी सायंकाळी ५ ते ७.३० वाजताच्या दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचून कारवाई केली.

या कारवाईत निखिल लहू हेरिटेल (वय २६, रा. कन्हाळगाव, सातगाव, बुटीबोरी) याला अटक करण्यात आली. तर खुशाल मरसकोल्हे (रा. तकिया, धंतोली) हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

आरोपींकडून १.१२३ किलो गांजा (किंमत २८,०७५ रुपये) तसेच ओप्पो कंपनीचा १५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ४३,०७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Advertisement

या प्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(२)(ब) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.