Published On : Wed, May 23rd, 2018

अनुसूचित जाती, जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क प्रशिक्षण

Advertisement

Free training for SC, ST students

नागपूर: अनुसूचित जाती व जमाती घटकातील बारावी उत्तीर्ण झालेल्या युवकांसाठी संगणक सॉफ्टवेअर हा एक वर्ष कालावधीचा प्रशिक्षण नि:शुल्क असून दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयातर्फे नि:शुल्क प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

नविन प्रशासकीय इमारत क्रमांक 1, पाचवा माळा येथील अनुसूचित जाती-जनजाती, राष्ट्रीय उपजिविका सेवाकेंद्रामार्फत विविध प्रशिक्षण आयोजित करण्यात येते. स्पेशल कोचिंग स्किम अंतर्गत 11 महिने कालावधिचे प्रशिक्षण येत्या जुलैपासून सुरु होणार आहे. या प्रशिक्षणामध्ये इंग्रजी टाईपिंग, इंग्रजी स्टेनोग्राफी, जनरल नॉलेज व बेसिक कॅम्प्यूटरचे प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी उमेदवार बारावी पास आवश्यक असून 18 ते 27 वयोगटातील उमेदवार पात्र राहतील.

कॅम्प्यूटर सॉफ्टवेअर हा एक वर्ष कालावधीचा प्रशिक्षण कार्यक्रमाचे 1 जुलैपासून सुरु होणार आहे. यासाठी उमेदवार बारावी पास आवश्यक आहे. कॅम्प्यूटर हार्डवेअर हा सुध्दा एक वर्ष कालावधीचा प्रशिक्षण कार्यक्रम 1 ऑगस्टपासून सुरु होत आहे. यासाठी उमेदवार बारावी पास व 18 ते 30 वयोगटातील असणे आवश्यक आहे. इच्छिूक अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीच्या पात्र उमेदवारांनी उपक्षेत्रिय रोजगार अधिकारी, राष्ट्रीय उपजिवीका सेवाकेंद्र, नवीन प्रशासकीय भवन इमारत क्रमांक 1, पाचवा माळा येथे संपर्क साधवा.