Published On : Tue, Sep 15th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या एमआयडीसीत भीषण हादसा; कन्वेयर बेल्टमध्ये हात अडकून ३० वर्षीय कामगाराचा मृत्यू

चार महिन्यांच्या बाळाच्या डोक्यावरून पित्याचे छत्र हरपले
Advertisement

कन्वेयर बेल्ट में फंसा हाथ, कंधे से हुआ अलग; 30 वर्षीय कामगार की मौत

नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निको हेवी इंजिनिअरिंग कास्टिंग लिमिटेड कंपनीत कामादरम्यान भीषण अपघात होऊन ३० वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. कन्वेयर बेल्टमध्ये हात अडकल्याने त्याचा हात खांद्यापासून वेगळा झाला. गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेत असताना त्याची प्रकृती अधिकच बिघडली. मेडिकल रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास प्लॉट क्रमांक ६५/२ येथील कंपनीत हा अपघात झाला. मृताची ओळख पंचशील नगर, इसासनी येथील रोहित रामदुलार चौबे (३०) अशी झाली आहे.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित नेहमीप्रमाणे सकाळी कामावर आला होता. लोहा वितळविणाऱ्या भट्टीजवळ रेती-माती वर नेणाऱ्या क्रेनवर तो काम करत होता. याचवेळी त्याचा हात कन्वेयर बेल्टच्या चपेटीत आला. या भीषण अपघातात त्याचा हात खांद्यापासून वेगळा झाला.

सहकाऱ्यांनी तत्काळ क्रेन बंद करून रोहितला खाली उतरवले. वेगळा झालेला हातही सोबत घेऊन त्याला डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Advertisement

रोहित यापूर्वी प्लंबर सहाय्यक म्हणून काम करत असल्याची माहिती आहे. कंपनीत प्रथमच त्याला एवढ्या उंचीवर कामासाठी पाठविण्यात आल्याचे सहकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. अपघातानंतर कंपनीत शोककळा पसरली आहे.

रोहितच्या पश्चात पत्नी आणि अवघ्या चार महिन्यांचे बाळ आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, बाळाच्या डोक्यावरून पित्याचे छत्र हरपले आहे. एमआयडीसी पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून अपघाताचा तपास सुरू केला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.