Published On : Mon, Nov 13th, 2017

ईलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन विकसीत करण्यासाठी फिनलॅंडसोबत करार

नागपूर: प्रदूषणावर नियंत्रणासाठी तसेच ग्रीन आणि क्लिन उर्जा वापरणा-या वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नागपूरात अद्यावत ईलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशनच्या विकासासाठी फिनलॅंडसोबत (फोर्टम इंडिया प्रा लि.) नागपूर महानगरपालिकेने सामंजस्य करार केला आहे. रविवारी (ता. १२ नोव्हेंबर) रोजी रेशिमबाग येथील ऍग्रोव्हीजन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मनपा आय़ुक्त अश्विन मुदगल आणि फिनलॅंड परिवहन मंत्र्यांचे प्रतिनीधी निना लास्कूनलाठी यांनी सामंजस्य कराराव स्वाक्षरी केली.

प्रामुख्याने कार्यकारी महापौर दिपराज पार्डीकर, परिवहन समिती सभापती बंटी कुकडे, नासुप्र सभापती डा. दिपक म्हैसेकर, मनपा अतिरिक्त आय़ुक्त रविंद्र कुंभारे, फिनलॅंड कान्सिलचे क्षेयस जोशी, नितीन सोमकुवर, फारटम इंडियाचे उपाध्यक्ष अवदेश झा, कार्गोटेक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक एमसी सुरेश कुमार, वार्टसिला इंडियाचे उपाध्यक्ष परवेज चुकटाए, त्रुतसाला ट्रेडिंगच्या मारिया पॅटिरोकर्नाकरी, मनपा परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल, संजय गायकवाड, नरेश बोरकर, उप अभियंता राजेश दुपारे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आधिका-यांची प्रमुख उपस्थिती होती.

रविवारी दुपारी १२ वाजता कार्यकारी महापौर दिपराज पार्डीकर व परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी विमानतळावर फिनलॅंडच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले. यानंतर शिष्टमंडळाने विमानतळ परिसरात असलेल्या व्हेईकल चार्जिंग स्टेशनला भेट दिली. ग्रीनबसने शिष्टमंडळाने रेशिमबाग मैदानात सुरु असलेल्या ऍग्रोव्हीजनला भेट दिली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी मा. गडकरी यांनी शिष्टमंडळाला मिहान येथे आपण प्रकल्प उभारावा तसेच येथील तरुणांना रोजगार द्यावा, आपल्याला आवश्यक सर्व मुलबूत सुविधा तातडीने उपलब्ध देण्यात येतील, अशी ग्वाही दिली.