Published On : Fri, Jul 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात एफडीएची मोठी कारवाई; इंदौर नमकीन प्रॉडक्ट्स’चा परवाना तात्काळ निलंबित!

Advertisement

नागपूर : नागपुरातील कामठी रोडवरील पिली नदी परिसरात असलेल्या इंदौर नमकीन प्रॉडक्ट्स या नमकीन व मिठाई उत्पादन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान बुरशी लागलेल्या मिठाया, कालबाह्य अन्नपदार्थ आणि गंभीर स्वच्छतेच्या त्रुटी आढळून आल्याने सुमारे 273 किलो अन्नपदार्थ जागेवरच नष्ट करण्यात आले. तसेच जनहित आणि जनआरोग्याचा विचार करून संस्थेचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.

एफडीएच्या अन्न सुरक्षा अधिकारी ए. एन. खंदारे यांनी संबंधित उत्पादन केंद्राची तपासणी केली. यावेळी मावा बर्फी, बंगाली मिठाईमध्ये बुरशी, तर मिल्क केक, दोडा बर्फी आणि चेरी हे पदार्थ कालबाह्य झाल्याचे आढळले. याशिवाय खराब व उरलेले अन्नपदार्थ कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवण्यात आले होते.

तपासणीत विक्रीसाठी ठेवलेल्या अन्नपदार्थांवर उत्पादन तारीख, बॅच क्रमांक, वापरण्याची अंतिम तारीख (एक्सपायरी) आणि परवाना क्रमांक नमूद नसल्याचेही निदर्शनास आले. तसेच चमचम मिठाईचे पॅकिंग पुन्हा वापरलेल्या टिनमध्ये करण्यात येत होते. उत्पादन परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून अन्नपदार्थांवर माश्यांचा वावरही आढळला.

या गंभीर अनियमिततेमुळे 61 हजार 800 रुपयांच्या किमतीचे 273 किलो अन्नपदार्थ जागेवरच नष्ट करण्यात आले. अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत कारवाई करत सहाय्यक आयुक्त (अन्न) यांनी संबंधित संस्थेचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.